Rajesh Tope, Raosaheb Danve
Rajesh Tope, Raosaheb Danve sarkarnama
मराठवाडा

राजेश टोपे भाजपमध्ये जाणार? दानवेंशी गुप्त भेट

सरकारनामा ब्यूरो

Raosaheb Danve : भाजप (BJP) नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज शिंदे गटाचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची भेट घेतली. खोतकर यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. त्यानंतर दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांचीही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

खोतकर यांच्या भेटीनंतर दानवे यांनी टोपे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचीही गुप्त भेट घेतल्याची माहिती आहे. यामुळे टोपे भाजपमध्ये जाणार का? अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास गुप्त भेट झालीची माहिती मिळत आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली. याचा तपशील समोर आला नसला तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवाय टोपे आणि दानवे यांच्यात झालेल्या भेटीमुळे टोपे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी दिल्लीमध्ये दानवे आणि खोतकर यांची भेट झाली होती.

दानवे आणि खोतकर यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करणारच असे खोतकर म्हणाले होते. खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघानांही एकत्रीत काम करण्याचा सल्ला दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT