Anil Deshmukh Bail : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांना तब्बल ११ महिन्यांनी जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. तब्बल 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर देशमुख यांना जामीन मिळाला आहे. देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 ला ईडीने अटक केली होती. त्यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
काही दिवसांपूर्वी देशमुख यांची तुरुंगात प्रकृती बिघडली होती. त्यानंतर जामीन मिळवण्यासाठी त्यांच्या वतीने प्रयत्न सुरु होते. देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला मात्र, ते तुरुंगाबाहेर येणार नाहीत. कारण देखमुख यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. यातील ईडीच्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला.
मात्र, त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या केसमध्ये त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे सीबीआयच्या केसमध्येही त्यांना जो पर्यंत जामीन मिळत नाही तो पर्यंत ते तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर देशमुख यांना जामीन मंजूर झाला.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने त्यांना मनी लाँड्रिंग केसमध्ये अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर सीबीआयने देखली गुन्हा दाखल केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या हा सत्याचा विजय आहे. आम्हाला माहिती होते की देशमुख निर्दोष आहेत. त्यांना अखेर जामीन मंजूर झाला. याचा आनंद आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.