धाराशिवमध्ये शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपा नेते, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केला. सुधीर पाटील यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
सुधीर पाटील हे कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. धाराशिव आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.
2017 मध्ये शिवसेना पक्षातून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता परत ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. कळंब धाराशिव विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सुधीर पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेत घरवापसी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये शिवसेनेकडून ही मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे.
धाराशिव जिल्ह्यातील विविध पक्षातील तीन नेते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अजून दोन नेते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. सुधीर पाटलांच्या शिवसेनेच्या प्रवेशानंतर हे दोन नेते कधी हाती धनुष्य़बाण घेणार याकडे मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.