Hingoli bjp Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : 'वेळ आली तर आम्ही धनुष्यबाणावर लढू, पण..' ; हिंगोली भाजपा नेत्यांची महायुतीकडे मागणी!

Hingoli Lok Sabha Constituency : भाजपच्या या आक्रमक पावित्र्यांनतर जिल्ह्यातील महायुतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jagdish Pansare

Hingoli BJP Politics : शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना हिंगोलीतून पुन्हा उमेदवारी जाहीर केली. पण त्यानंतर महायुतीत घमासान सुरू झाले असून हेमंत पाटील यांची उमेदवारी बदला. ही जागा भाजपला द्या, वेळ आली तर आम्ही धनुष्यबाण चिन्हावर लढू, पण उमेदवार बदला, अशी आग्रही मागणी भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता बैठकीत करण्यात आली. भाजपच्या या आक्रमक पावित्र्यांनतर जिल्ह्यातील महायुतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा सुरुवातीपासून होती. परंतु महायुतीत ही जागा भाजपला सुटेल, असा विश्वास स्थानिक नेत्यांना होता. तसे प्रयत्नही गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. परंतु महायुतीत जागा वाटपावरून वाढत चाललेली ताणाताणी, विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह पाहता भाजपच्या राज्यातील नेत्यानी नरमाईची भूमिका घेतली. शिवसेनेने जाहीर केलेल्या आठ उमेदवारांच्या पहिल्या यादीत हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर जिल्ह्यातील भाजपच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. त्याचे पडसाद माजी खासदार शिवाजी माने यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेतून उमटले. त्यानंतर आज पुन्हा हेमंत पाटील यांची उमेदवारी बदला, ही जागा भाजपला द्या, उमेदवारी कोणालाही द्या, वेळ आली तर आम्ही धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढायला तयार आहोत, अशी भूमिकाही आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह बैठकीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतली.

हिंगोलीचा उमेदवार बदला या मागणीसाठी आम्ही लवकरच मुंबईत वरिष्ठ नेत्यांना भेटायला जाणार आहोत, असेही या बैठकीत सांगण्यात आले. महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करावी, असा एकमुखी ठरावरही या बैठकीत घेण्यात आला. भाजपच्या तीन आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT