BJP Vs Uddhav Thakray News : इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांनी मणिपूर येथे जाऊन यावे. त्यांचा जाण्या- येण्याचा खर्च मी करतो. अन्यथा मणिपूर विषयावर पिक्चर निघेल असे ठाकरे म्हणाले होते ठाकरे यांची ही टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यासंदर्भात भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, निवडणुका जवळ आल्यामुळे हे लोक आता काय काय विधाने करतील आणि काय काय टीका करतील याचा नेम नाही. अजूनही बरेच काही बोलतील असे दिसते. भाजप विरोधात टीका करताना त्यांची मजल कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही.
महाजन म्हणाले, महाविकास आघाडीची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ठाकरे यांनी भाजपवर टीका करणे सोडून दिले पाहिजे. त्याऐवजी येत्या निवडणुकीत राज्यात किमान एखादी तरी जागा निवडून येईल का? याचा विचार करावा. त्यासाठी त्यांनी निवडणुकीत काम करावे. हे ज्या चार-पाच जणांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, तो पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. अन्यथा त्यांचाच पिक्चर बघण्याची वेळ जनतेवर येईल अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.
महाजन म्हणाले, महायुतीच्या जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. नाशिक मतदारसंघाचा निर्णय देखील लवकरच होईल. प्रत्येकालाच हा मतदारसंघ हवा आहे त्यामुळे चर्चा लांबली आहे.
त्यावर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेतून ते जागा वाटपाचा तिढा सोडवतील. याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल.
(Ediyted by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.