Bajrang Sonwane Vs Pankaja Munde Sarkaranama
मराठवाडा

Pankaja Munde phone Call : मंत्री पंकजा मुंडेंचा शरद पवारांच्या खासदाराला काॅल; दोघांमध्ये काय ठरलं? ...तर सोनवणेंची राजीनाम्याची तयारी!

BJP leader Pankaja Munde NCP chief Sharad Pawar Beed MP Bajrang Sonwane Maharashtra political : भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी काॅल केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

Pradeep Pendhare

BJP vs NCP latest : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे, बीड जिल्हा! मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आली.

महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षानं टोक गाठलं. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील राजकीय संघर्ष वेगळ्याच वळणावर पोचला होता. त्यामुळे कोणीही कोणाशी संपर्क केला किंवा एकत्र दिसले, तरी चर्चेचा विषय होता. आता भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी तशी माहिती दिली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांच्यासह इतर सर्व पक्षीय आमदार चांगलेच आक्रमक होते. यातल्या यात आमदार धस यांनी या प्रकरणाचा विधानसभा सभागृहापासून, प्रशासकीय पातळीवर खूप पाठपुरावा केला. या प्रकरणाच्या निमित्ताने त्यांनी बीडच्या प्रशासनात घुसलेल्या भ्रष्ट कारभारार घाणाघात केला.

बीड (BEED) जिल्ह्यात बिंदु नामावलीची वाट लागली असल्याचा आरोप करताना, आमदार धस यांनी बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीची वाट का लागली याचे शोध मोहिम राबवली पाहिजे. हे कोणामुळे झाले? का झाले? याची माहिती काढली पाहिजे, अशी मागणी केली होती. याचा पाठपुरावा आता भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू केला आहे. याच संदर्भात मंत्री मुंडे यांनी आपल्यावर आरोप केले होते. या आरोपांनंतर चुकून तुमचं नाव घेतलं, माफी मागितली, यासाठी मंत्री मुंडे यांनी संपर्क केल्याचा खुलासा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजप पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली होती. पंकजा मुंडे यांना सुरुवातील विजयी घोषित केलं होतं. पण, फेर मोजणीच्या मागणीत बजरंग सोनवणे विजयी झाले. यानंतर मुंडे आणि सोनवणे यांच्यातील राजकीय संघर्ष कायम राहिला. पंकजा मुंडे पुढे विधान परिषदेवर जात, महायुती सरकारमध्ये मंत्री देखील झाल्या आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आली, प्रशासनातील कारभार सुधारण्यासाठी मंत्री मुंडे यांनी काहीसा पुढाकार घेतला आहे. त्यातून त्यांनी खासदार सोनवणे यांना संपर्क केल्याचे समोर आले आहे. बिंदु नामावली संदर्भात हा काॅल होता, बिंदु नामावलीत माझ्या कालावधीत काही गैरप्रकार घडला असेल, असे पुरावे दिले, तर मी जनतेची माफी मागून राजीनामा देईल, असं आपण आव्हान देखील दिलं असल्याचं खासदार सोनवणे यांनी सांगितलं.

वाल्मिक कराड याची दाउदशी तुलना

वाल्मिक कराड याने त्याच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसा त्याने न्यायालयाकडे देखील अर्ज केला आहे. यावर बजरंग सोनवणे यांनी सगळे आरोपींना मला गुन्हे मान्य नाहीत, असे म्हणत आहेत. दुबईत बसून दाउद देशात सगळ चालवतो तसा वाल्मिक कराड परळीत बसून सर्व काही चालवत होता. तुरुंगात VIP ट्रिटमेंटला अडथळा म्हणून, मारहाणीचं प्रकर झालं. आरोपीला दुसऱ्या जेलमध्ये करमत नाही. यातून पुन्हा बीड जेलची मागणी केली आहे. परत गँगमध्ये येण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही बजरंग सोनवणे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT