Pratap Sarnaik : संतापलेल्या सरनाईकांची एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी धावपळ, राजशिष्टाचार मोडून अधिकाऱ्याला भेटले

Pratap Sarnaik Meets Officer, ST employees Salary Issue : संतापलेल्या सरनाईकांची एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. ते राजशिष्टाचार मोडून अधिकाऱ्याला भेटले.
Pratap Sarnaik and ST Department
Pratap Sarnaik and ST Department Sarkarnama
Published on
Updated on

ST Employees Salary : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. परिवहन महामंडळाकडे निधी नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. यावरून परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी (दि. ११) संतापलेल्या सरनाईकांची एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी चांगलीच धावपळ झाल्याचे दिसले.

प्रताप सरनाईक यांची एसटी कर्मचाऱ्यांसाठी तळमळ पाहायला मिळाली. सरनाईक हे राजशिष्टाचार मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीला गेले. सचिवानं मंत्र्याला भेटण्यासाठी यावं असा राजशिष्टाचार आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरनाईकांनी राज शिष्टाचार मोडला. राजशिष्टाचार मोडून ते अर्थ खात्याच्या सचिवांच्या भेटीला गेले.

Pratap Sarnaik and ST Department
Raigad : अमित शहांसाठी तटकरे आखणार फक्कड बेत; 'कोकणचा मेवा' खायला देऊन खुशच करणार!

अर्थखात्याच्या सचिवांची भेट घेतल्यानंतर, एसटीतील पगारासाठी १४४ कोटी रुपये सरकारकडून तातडीनं दिले जात आहेत. तसेच यापुढे एक महिना आधीच निधी एसटी महामंडळाला दिला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होईल अशी माहिती देत सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं.

सरनाईक पुढे म्हणाले, १७६ कोटी रुपयांची जी मागणी होती ती १२० कोटी रुपये मायनस करुन उर्वरीत रक्कम तीन टप्प्यात देण्याचे वित्त विभागाने मान्य केले आहे. त्याचबरोबर जे पैसे आम्ही मागत आहे, त्याचे ऑडिट करुन तशा प्रकारचा प्रस्ताव खात्याला सादर करायचा आहे. त्यामुळे सकारात्मक निर्णय झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. पुढल्या महिन्यापासून सात तारखेला त्यांचा पगार त्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल.

अजित पवार म्हणाले होते की काही योजना अशाप्रकारे राबविल्या गेल्या ज्यामुळे एसटी तोट्यात गेली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर बोलताना सरनाईक म्हणाले, अजित दादा असे काही म्हणाले नाही. दादांची बाईट मी बघितली.

काही योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना घोषित केल्या त्या योजनांमुळे एसटी महामंडळाला फायदाच झालेला आहे. ५० टक्के महिलांना जो मोफत प्रवास दिला. त्याचबरोबर ७५ वर्षांवरील नागरिकांना जो मोफत प्रवास दिला. त्याचाही फायदा एसटी महामंडळाला फायदाच झाला. कारण त्याची प्रतिकृती राज्यशासनाच्या माध्यमातून होत असते. फक्त ती वेळेवर न झाल्याने असे संकट निर्माण झाले. भविष्यात असे संकट निर्माण होणार नाही नाही असे सरनाईक म्हणाले.

Pratap Sarnaik and ST Department
Tahawwur Rana terror Plot : ''मुंबईच नाही तर देशभरातील अन्य शहरंही होती तहव्वूर राणाच्या टार्गेटवर'' ; 'NIA'चा मोठा दावा!

सरनाईक म्हणाले मी देखील रिक्षा ड्रायव्हर होतो. मी आठ नऊ वर्ष रिक्षा चालवली. एकनाथ शिंदे साहेब आणि मी दोघांनी एकत्र काम केलं आहे. मी स्वत: गरिबीतून वर आल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतो. आता एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला आहे हे आवर्जुन सांगतो, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com