Ambadas Danve On Nilesh Rane  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Nitesh Rane : टिल्ल्या जा, देवगिरी बंगल्यावर सलाम ठोकून ये..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत बंड झाले. स्वतः अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपल्या ८ सहकाऱ्यांना मंत्री केले. (Ambadas Danve On Nilesh Rane) काही दिवसांपुर्वी भाजप, शिंदे गटाचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेत होते, त्यांची टिंगलटवाळी करत होते. तर त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात होते.

आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्यानंतर त्यांची होणारी कोंडी पाहता समाज माध्यमांवर पोस्टचा भडीमार सुरू झाला आहे. (Shivsena) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील यात आघाडीवर आहेत. आपल्या फेसबुक अन् ट्वीटर हॅन्लडवरून गेल्या दोन दिवसांपासून ते शिंदे गट- भाजपला टोले लगावत आहेत.

आज त्यांच्या निशाण्यावर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना आणि त्यानंतर विरोधकांच्या भूमिकेत असतांना नितेश राणे यांनी (Ajit Pawar) अजित पवारांवर बरीच टीका केली होती. त्याला अजित पवारांनी आपल्या खास शैलीत सुनावले होते. राणे यांच्या टीकेवर अजित पवारांनी फटकारल्याची आठवण दानवे यांनी करून दिली.

अजित पवार म्हणाले होते, `टिल्ल्या लोकांनी असं काही सागांयच कारण नाही, त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देवू`? यावर नितेश राणे म्हणाले होते, ` लंघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर त्यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले.

यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिध्द झाले की यांना औरंग्यावरची टीका सहन होत नाही. अंबादास दानवे यांनी नेमकी याचीच आठवण करून देत नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. टिल्या जा देवगिरी बंगल्यावर सकाळी सकाळी सलाम ठोकून ये, झाल गेल विसरुन जा! असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT