Mumbai News : भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी नगरपालिकेची स्पेशल ऑडिटची मागणी करताना खळबळजनक दावा केला आहे.
"सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी विष्णू चाटे याच्या नावावर परळीत 46 कोटींचे बिल उचलली गेली आहेत. परंतु, एकाच वेळा रस्त्यावर पाच-पाचवेळा बिल उचलली गेल्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट झालं पाहिजे", अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी परळी नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. 'मी ऑडिटर द्या म्हटलो होतो. पण आता स्पेशल ऑडिट व्हावे, ही माझी मागणी असणार आहे. कारण एका-एका व्यक्तीच्या नावावर 46-46 कोटी रुपयांची बिल उचलेली गेली आहे. विष्णू चाटे नावाचा आरोपी आहे, त्याच्या नावावर ही बिल काढली गेली आहेत', असा आरोप आमदार धस यांनी केला.
'एकाच रस्त्यावर पाच-पाचवेळा बिल उचलली गेली आहेत. माध्यमांनी परळी शहरातील रस्त्यांची पाहणी करावी. त्याला प्रमाणपत्र द्यावे. माझा मतदारसंघ आष्टी आहे. परळी अन् आष्टी शहरातील रस्त्यांची तुलना करावी', असेही आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी माध्यमांना चॅलेंज दिले.
दरम्यान, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर, शिरसळा पोलिस ठाण्यात दहा ते सतरा वर्षांपासून सतत एकाच ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात. तसेच वाल्मिक कराड याला पसार होण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी मदत केली आहे, त्यांचे नंबर, कागदपत्र सर्व पुरावे दिले आहेत. त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले.
याशिवाय परळी थर्मलमधील अधिकारी गेल्या 20 वर्षांपासून एकाच ठिकाणी आहे. अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदली होते. एखाद्या वर्षी वाढवून मिळू शकते. पाचव्या वर्षी त्याच ठिकाणी राहायचे असेल, तर मुख्यमंत्र्यांची विशेष परवानगी लागते. परळी थर्मलमध्ये गेल्या 20 वर्षांपासून अधिकाऱ्यांची बदली झालेली नाही. यासंदर्भात कोणत्या मुख्यमंत्र्यांची परवानगी होती? तसे पत्र होते का? याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.