Suresh Dhas 1 Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : 'मंत्रीपद नको, पालकमंत्रीपद नको, मेरे पास देवेंद्र फडणवीस है'; सुरेश धसांचा हिणवणाऱ्यांना सूचक इशारा (पाहा VIDEO)

BJP MLA Suresh Dhas CM Devendra Fadnavis Minister Pankaja Munde Beed Ashti Khuntephal : भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी खुंटेफळ सिंचन प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमात भाषण करताना जोरदार टोलेबाजी केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री किंवा पालकमंत्री नसलो म्हणून काय झालो, असे मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर सांगताना मेरे पास देवेंद्र फडणवीससाहेबांचा आशीर्वाद आहे, असा सूचक इशारा दिला आहे.

आमदार धस यांनी एकप्रकारे यातून पुढचा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार असे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीड (BEED) जिल्ह्यातील आष्टीमधील खुंटेफळ इथल्या संचिन प्रकल्पाचे उद्घाटन झाले. भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील हा कार्यक्रम होता. यावेळी आमदार धस यांनी भाषणात जोरदार टोलेबाजी केली. याच खुंटेफळ इथं दगड मारली गेली. पण 'दुश्मन' चित्रपटाप्रमाणे मी या लोकांची पुन्हा मनं जिंकली, अशी कटू आठवण धस यांनी सांगितली.

सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण सांगताना, 1999 ते 2004 या कालावधीत मी त्यांचाबरोबर होतो. हाताखाली काम करताना, त्यांच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे बाॅक्स खालून वर काढून द्यायचो. 2019 मध्ये माझ्यावर, माझ्या कुटुंबावर वेगवेगळी कटकारस्थाने करून माझी बदनामी करण्यात आली. त्रास दिला. हे सांगताना, 2019 मध्ये बहुमतात येऊन सुद्धा, आपण मुख्यमंत्री झाला नाहीत. जनाधार असून सुद्धा सत्तेपासून लांब राहावं लागलं. राजकारणातून उद्धवस्त करण्याचे कटकारस्थान करण्यात आले. परंतु कुशाग्र बुद्धिने संघर्ष केला, त्यावर मात केली. त्याला तोडच नाही. बिनजोड पैलवान म्हणतात, तो हा पैलवान आहे, असा उल्लेख करताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

फडणवीस बिनजोड पैलवान

'बिनजोड पैलवान आहात तुम्ही. अभिमान आहे, साहेब. विरोधी पक्षनेता असताना 106, वरचे 26, अशा आमदारांची मोट जुळवून ठेवली. मला निवडणूक आणण्यासाठी पंकजाताई आणि तुम्ही मला मदत केली. या काळात आपला एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही. तुमच्या प्रेमामुळे एकही माणूस फुटला नाही. आमच्यांवर त्या कालावधीत 30-30 केस झाल्या. रात्री पोलिस पाठवायचे. इतके वाईट दिवस काढले. पण कोणाच्या दारात गेलो नाही', याची आठवण सुरेश धस यांनी करून दिली.

धस झाले भावनात्मक...

''दिवार' चित्रपटामधील एका सीनची आठवण करून देताना, अमिताभ बच्चन अन् शशी कपूर हे भाऊ या चित्रपटात दाखवले आहेत. शशी कपूर पोलिस असतो. अमिताभ बच्चन झंटा-बंटा दाखवला. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है. त्यावर शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत मिळतो आहे. माझी तर आई गेली. वडील गेले. माझी दुसरी आई जिवंत आहे. ती लपवली नाही. सभागृहामध्ये तुम्हाला विचारले आईचे नाव घेऊन का? तेव्हा मी माझ्या दुसऱ्या आईचे सुद्धा नाव घेतले', अशी भावनात्मक मुद्दा सुरेश धस यांनी मांडला.

हिणवणाऱ्यांना टोला

'आता त्यावेळी बऱ्याच जणांना आशा होती. याला का मिळतंय का? काही नको. मंत्रीपद नको, पालकमंत्रिपद नको. आणखी दुसरं काही नको. पण चार टीएमसी अन् दुसरीकडे साडेतीन टीएमसी द्या. मला हिणवतात. याचं काय होणार म्हणून, हिणवतात. नुसता मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करतो म्हणून हिणवतात. तेव्हा म्हणतात, तेरे पास क्या है. तेव्हा मी म्हणतो, 'मेरे पास देवेंद्र फडणवीससाहेबांचा आशीर्वाद है'', असा टोला सुरेश धस यांनी हिणवणाऱ्यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT