Suresh Dhas 3 Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : ड्रग्स तस्करींमधील गुन्हेगारांबरोबर 'मेन आकां'चा दाखवला फोटो; आमदार धस यांनी मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढवल्या

BJP MLA Suresh Dhas minister Dhananjay Munde drug smugglers march in Dharashiv Beed Santosh Deshmukh Parbhani Somnath Suryawanshi : धाराशिव इथं संतोष देशमुख हत्येचा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणाच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप.

Pradeep Pendhare

Mumbai News : धाराशिव इथं बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे ड्रग्स तस्करांबरोबरचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली.

आमदार धस यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मंत्री मुंडे यांच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. आमदार धस यांच्या या गौप्यस्फोटावर मंत्री धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी या सभेतील भाषणा दरम्यान, एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण दाखवले. पाकिस्तानातून तस्करी झालेल्या ड्रग्जवर गुजरातमध्ये झालेल्या कारवाईची आठ महिन्यांपूर्वीचा बातमी असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुजरातमध्ये तीन दिवसांत 890 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करत महाराष्ट्रातील तिघांसह पाच जणांना अटक केली, केलेली ही बातमी आहे.

या बातमीचा संदर्भ देताना भाजप आमदार धस यांनी, 'या ड्रग्स तस्करीच्या कारवाईत अटक करण्यात आलेला कैलास सानप आणि दत्ता आंधळे कोण आहेत? हे दोघे गेल्या दीड ते एक वर्षांपासून ड्रग्स तस्करीत अटकेत आहेत. यांचे फोटो कोणाबरोबर आहे, तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबरोबर. आका... मेन आका... हा फोटो बघा, असे सांगून हा जाहीर सभेत फोटो दाखवले. हा फोटो देखील व्हाॅट्सअप टाकतो. करा खुलासे. द्या आम्हाला शिव्या. धमक्या देत आहेत. अंजली दमानिया यांना धमक्या देत आहेत. मला देखील धमक्यांचा मेसेज आलाय', असे सांगून खळबळ उडवून दिली.

या ड्रग्स तस्करांच्या फोटोंच्या आरोपापूर्वी आमदार सुरेश धस यांनी, बीडमधील सांस्कृतिक महोत्सवाच्या खर्चांवरून आरोप केले. वाल्मिक कराड याने याचे टेंडर परभणीतील एकाला दिले होते. त्या दोघांचे फोटो देखील सुरेश धस यांनी दाखवले. या सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च झाला 10 लाख रुपये. जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यावर बिल काढलं पाच कोटी रुपये, असा आरोप देखील आमदार धस यांनी केला.

ड्रग्स प्रकरणात नेमकं काय...

पाकिस्तानच्या पसनी बंदरातून हशीशचा साठा घेऊन भारतात पाठवण्यात आला. 22-23 एप्रिल 2024 च्या मध्यरात्री भारतीय मच्छिमारांची बोट यासाठी भाड्याने घेण्यात आली. 27-28 एप्रिल 2024 ही बोट पसनी बंदरातून गुजरात किनाऱ्यावर येत होती. तेथून हे अमली पदार्थ भारतात पाठवणार होते. तटरक्षक दलानं पोरबंदरजवळच्या समुद्रातच ही बोट अडवून ताब्यात घेतली. त्यावेळी बोटीतून 60 कोटी रुपयांचे 173 किलो हशीश जप्त करण्यात आले होते.

ड्रग्स तस्करांचा पाकिस्तानशी संबंध

याप्रकरणी महाराष्ट्रातील तीन जणांसह एकूण 5 तस्करांना अटक करण्यात आली. तटरक्षक दलानं बोटीसह मंगेश तुकाराम आरोटे ऊर्फ साहू, हरिदास कुलाल ऊर्फ पुरी या दोघांना, तर पुढं गुजरात एटीएसने कैलास सानप, दत्ता आंधळे आणि अली असगर ऊर्फ आरिफ बिदाना याला अटक केली. हे पाचही पाकिस्तानस्थित ड्रग्स माफिया फिदाच्या संपर्कात होते. गेल्या तीन दिवसात गुजरातमध्ये त्यावेळी 890 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT