MLA Tanhaji Mutkule News Sarkarnama
मराठवाडा

BJP MLA News : भाजप आमदाराची प्रकृती बिघडली, 'एअर अ‍ॅम्ब्युलन्स'ने मुंबईला हलवले

BJP MLA Tanhaji Mutkule health deteriorated : फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मुटकुळे यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार हिंगोलीहून नांदेडला जाण्यापुर्वी मुटकुळे व त्यांच्या कुटुंबियांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता.

Jagdish Pansare

Hingoli BJP News : भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने मुंबईला हलवण्यात आले आहे. दोन महिन्यापुर्वी मुटकुळे यांची छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात अॅन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असताना आमदार मुटकुळे हे पक्षाचे कार्यक्रम, मेळाव्यांना हजर होते. आज अचानक श्वास घ्यायला त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली.

फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मुटकुळे यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार हिंगोलीहून नांदेडला जाण्यापुर्वी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) व त्यांच्या कुटुंबियांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर फडणवीस यांनी मुटकुळे यांना मुंबईला हलवण्यासाठी नांदेडहून एअर अॅम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली.

त्यानंतर मुटकुळे यांना नांदेडहून मुंबईला हलवण्यात आले आहे. तान्हाजी मुटकुळे हे विधानसभेच्या हिंगोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून पुन्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नुकताच हिंगोलीमध्ये माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

या मेळाव्याच्या दोन दिवस आधीच आमदार मुटकुळे हे छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती झाले होते. (BJP) परंतु मतदारसंघात भाजपच्या मेळाव्याला उपस्थितीत राहणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी डाॅक्टरांना सुटी देण्याची विनंती केली होती. रुग्णालयातून सुटी घेऊन मुटकुळे यांनी मेळाव्याला हजेरी लावली.

त्यानंतर आपल्याला आता बरे वाटत असल्याचे सांगत त्यांनी हिंगोली येथील निवासस्थानीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. पण आज पुन्हा श्वास घ्यायला त्रास होत असल्याची तक्रार मुटकुळे यांनी केली. तेव्हा कुटुंबियांनी मुटकुळे यांना मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT