Nanded BJP News Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : भाजप जम्बो कार्यकारिणीला `मिशन ४५ प्लस`चे आव्हान पेलावे लागणार...

BJP News : नांदेड शहरात पक्षाचे बळ वाढविण्याची जबाबदारी दिलीप कंदकुर्ते यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Jagdish Pansare

Marathwada Political News : लोकसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू केली आहे. (Nanded BJP News) महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने मिशन ४५ प्लसचे ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. नांदेड लोकसभेची जागा कायम ठेवण्यासाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.

नांदेड शहर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर अशी विभागणी करून (BJP) भाजपने तीन अध्यक्ष , सरचिटणीस १५, उपाध्यक्ष ३०, चिटणीस ३०, तालुका अध्यक्ष १७, विविध आघाड्याचे १८ जिल्हाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी शंभरच्यावर‌ जम्बो कार्यकारिणी जाहीर करून लोकसभेच्या निवडणुकीसाठी नव्या शिलेदारांना कामाला लावले आहे. (Nanded) तर दुसरीकडे काँग्रेस गेल्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारीला लागली आहे.

ही जागा भाजपकडून खेचून आणण्यासाठी नेते प्रयत्न करणार आहे, तर भारतीय जनता पक्ष ही जागा कायम ठेवण्यासाठी आपली प्रतिष्ठापणाला लावेल. (Marathwada) लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने संघटनात्मक पातळीवर बांधणी करून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षात गेल्या दहा वर्षांत इतर पक्षांतील बड्या नेत्यांची घाऊक प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी शोधून काढावे लागत आहेत.

`पार्टी विथ डिफ्रंस` असे म्हणणाऱ्या पक्षाची परिस्थिती आज `पार्टी विथ आॅल` अशी झाली आहे. जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी निवड करताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बरीच धांदल उडाली व वादाचे प्रसंग आले. या सर्व गोष्टींवर मात करून एकदाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करून सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

नांदेड शहरात पक्षाचे बळ वाढविण्याची जबाबदारी दिलीप कंदकुर्ते यांच्यावर सोपवण्यात आली आहे, तर नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा सुधाकर भोयर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या दिलीप कंदकुर्ते हे काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत, तर संतुकराव हंबर्डे हे अलीकडच्या काळातील पदाधिकारी आहेत. नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून, त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे.

या तिन्ही जिल्हाध्यक्षांसोबत महिला, ओबीसी, आदिवासी, युवा, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राहणार आहेत. याशिवाय विभागाचे तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिळून ही जिल्हा कार्यकारिणी दोनशेहून अधिक आहे. या जम्बो कार्यकारिणीला येत्या सहा महिन्यांत काम दाखवावे लागणार आहे. जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मिशन ४५ प्लसचे ध्येय साध्य करताना काँग्रेसशी दोन हात करावे लागणार आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून फक्त चार वेळा काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसतर निवडून आलेला उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला नाही हा इतिहास मोडीत काढण्याचे आव्हान या जम्बो कार्यकारिणीला पेलावे लागणार आहे. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला आहे. त्यामुळे काँग्रेस आपलीं संपूर्ण शक्ती पणाला लावून ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT