Sushma Andhare News : लावारिस ट्रोलर्स, स्लीपर सेल गद्दार, शाउटिंग ब्रिगेड.. ; अंधारेंची पोस्ट व्हायरल !

Sushma Andhare News : राऊतांचा वाढदिवस शिवसैनिकांसाठी 'निष्ठा दिवस..'
Sushma Andhare News
Sushma Andhare NewsSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. राजकीय वर्तुळातून, शिवसैनिकांकडून, अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "सन्माननीय संजय राऊत सर. शिवसेनेचे चिलखत. आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी "निष्ठा"दिवस आहे. लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare News
Maratha Reservation : संजय राऊत म्हणतात ''कॅबिनेटमध्ये गँगवॉर''; तर शंभूराज देसाईंनीही केला पलटवार, म्हणाले...

"ही समष्टीची लढाई म्हणजे हुकूमशाही विरोधातला विद्रोहच जणू. पण ज्यांना हा विद्रोह कळत नाही, जे समजून उमजून सोयीस्कररित्या आपला स्वार्थ साधण्यासाठी मौन बाळगतात. अशांसाठी कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ दादा जे बिरुद वापरतात ते योग्यच. पण सत्तेसाठी जी हुजुरी करणारे , प्रसंगी आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे हे विसरणारे मात्र मग थयथयाट करतात. जसा गद्दारांवर आपण केलेल्या हल्ल्यानंतर काल काहींनी थयथयाट केला," असेही अंधारे म्हणाल्या

"सर, माझ्यासाठी आपण कायम कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती आहात. सगळ्यांना सांभाळून घेणारा मोठा भाऊ असे वाटत राहिलात. पक्षप्रवेशनांतर आपल्याला भेटायचे तोच सूड भावनेतून झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे आपल्याला भेटता आले नाही. आपल्या गैरहजेरीत माझ्या परीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पण आपला अत्यंत लढाऊ आणि कर्तबगार असा मोठा भाऊ काही काळासाठी सोबत नाही, ही उणीव आम्हाला अधिक जबाबदारीने वागण्याचे भान देत होती," असा निर्धारही अंधारेंनी बोलून दाखविला.

Sushma Andhare News
Dhule Politics on Statue : पंडित नेहरूंच्या पुतळ्यावरून शिवसेना भाजपमध्ये जोरदार तू तू मैं मैं!

"सामनाच्या संपादकीयमधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या-जगण्यात ही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत. सर, ज्यांना बहिण-भाऊ किंवा बाप-लेक अशी नातीच ज्ञात नाहीत किंवा त्यांच्या घरात तसे संस्कारच शिकवले नाहीत असे तद्दन बौद्धिक दिवाळखोर जेव्हा त्यांच्या कुटुंब, संघटना तथा नेतृत्वाच्या संस्काराचा विकृत परिचय देतात. अधूनमधून जेव्हा ट्रोलिंग, दबावतंत्र यामुळे माझे कुटुंबीय अस्वस्थ होते तेव्हा आम्ही आपला, आपल्या कुटुंबाचा त्यांनी मधल्या काळात जे दिव्य सोसलं त्याचा विचार करतो अन् मग कळतं, अरेच्चा.. वर्षावहिनी किंवा तुमच्या आईंनी जे सोसलं त्यापुढे हे काहीच नाही, अशी भावनाही अंधारेंनी व्यक्त केली.

"मधल्या काळात नीलम गोऱ्हे या आपली उपसभापती पदाची खुर्ची वाचवण्यासाठी गद्दारी करून गेल्या. पण आपल्या गद्दारीचे लंगडे समर्थन करताना, मला राऊतांचे बोलणे पटत नव्हते असे सांगितले, तेव्हा मात्र निष्ठावान शिवसैनिकांनी गोऱ्हे नावाचा शेवटचा बेईमान चिरा निखळला म्हणून आनंदच व्यक्त केला हे, उल्लेखनीय आहे, असा वारही अंधारेंनी केला.

Sushma Andhare News
Congress Vs BJP : मध्य प्रदेशातील भाजप, काँग्रेस चिंतेत; अंतर्गत सर्व्हेमुळे ताण वाढला

"सर , ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय, जिवाच्या आकांताने हा मातोश्रींचा गढ वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ते केवळ अतुलनीय आहे. लावारिस पेड ट्रोलअर्स, स्लीपर सेल मधले गद्दार, एवढं धमकावून ही हा बधत कसा नाही? हा विचार करून हार मानणारी शाउटिंग ब्रिगेड अन् मातोश्रीने भरभरून दिल्यावरही बेईमान होणारे स्वार्थी नेते या सगळ्यांना आपण तोंड देत आहात. आपला ऊर्जास्व लढा फलद्रूप होवो, या सदिच्छासह पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com