Ashok Chavan-led BJP secures Mayor and Deputy Mayor posts in Nanded-Waghala Municipal Corporation after winning clear majority in civic elections. Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan BJP : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात नांदेड-वाघाळा महापालिकेत शतप्रतिशत भाजपा; पाठिंबा देऊनही शिवसेनेची झोळी रिकामीच!

Nanded Waghala Corporation : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात नांदेड-वाघाळा महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत महापौर-उपमहापौर पदे स्वतःकडे ठेवली असून पाठिंबा देऊनही शिवसेनेला सत्तेत वाटा मिळालेला नाही.

Jagdish Pansare

Nanded Municipal Corporation News : पक्ष कोणताही असो, नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचेच नेतृत्व चालते याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आतापर्यंत नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसने कायम एकहाती सत्ता राखली. तीच परंपरा अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये आल्यानंतरही कायम राखली. बहुमतासह सत्ता स्थापन केल्यानंतर नांदेडमध्ये महापौर-उपमहापौर ही दोन्ही पद आपल्याकडेच ठेवली. महापौर पदासाठी चव्हाण समर्थक कविता मुळे, तर उपमहापौर पदासाठी दिपकसिंह रावत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाने महापालिकेत 45 जागा जिंकत स्वबळावर बहुमत पटकावले. शिवसेनेने भाजपसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली. या पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले. भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत शिवसेनेने युती धर्म पाळला. पण अशोक चव्हाण यांनी त्यांना सत्तेत मात्र वाटा दिला नाही. त्यामुळे पाठिंबा दिल्यानंतरही शिवसेनेची झोळी रिकामीच राहिली, असे चित्र सध्या आहे. पुढे शिवसेनेला सत्तेत काही वाटा अशोक चव्हाण देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज शुक्रवार (ता.06) नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. महापौर पदासाठी एकूण 5 तर उपमहापौर पदासाठी 5 अर्ज दाखल करण्यात आले असले तरी भाजपच्या वतीने महापौरपदासाठी कविता संतोष मुळे यांचा तर उपमहापौरपदासाठी दिपकसिंह रावत यांचा अर्ज दाखल झाल्याने आता त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपला अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले. शिवसेनाच्या चार नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची एकूण सदस्यसंख्या 49 वर पोहोचली आहे. त्यामुळे महापौर निवडीत भाजपची बाजू भक्कम मानली जात आहे. दुसरीकडे एमआयएमने 14 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. तर काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने 5 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. एका अपक्ष उमेदवाराचाही विजय झाला आहे.

महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले भुषवणार आहेत. या सभेमध्ये महापौर व उपमहापौर निवडीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT