Nanded Mayor Election : नांदेडच्या महापौर पदासाठी कविता मुळे-ज्योती कल्याणकर यांच्यात स्पर्धा; अशोक चव्हाणांचे वजन कोणाच्या पारड्यात?

BJP News Ashok Chavan : नांदेड महापौरपदासाठी भाजपमध्ये कविता मुळे आणि ज्योती कल्याणकर यांच्यात चुरस वाढली असून अशोक चव्हाण कोणाच्या बाजूने झुकतात यावर अंतिम निर्णय ठरणार आहे.
BJP leaders and women corporators during the Nanded Municipal Corporation meeting as the mayoral contest between Kavita Mule and Jyoti Kalyankar gains momentum under Ashok Chavan’s influence.
BJP leaders and women corporators during the Nanded Municipal Corporation meeting as the mayoral contest between Kavita Mule and Jyoti Kalyankar gains momentum under Ashok Chavan’s influence.Sarkarnama
Published on
Updated on

Mayor Election News : नांदेडचा महापौर इथे नाही, तर राज्याची कोअर कमिटी ठरवणार, असे सांगत भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निष्ठावंतांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतु नांदेडचा महापौर अशोक चव्हाणच ठरवणार हे आता स्पष्ट झाले आहे. नांदेड-वाघाळा शहर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण (खुला) महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी कविता मुळे, ज्योती कल्याणकर यांच्यात रस्सीखेच आहे. आता अशोक चव्हाण या दोघींपैकी कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात? यावर महापौर ठरणार आहे.

महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातून 12 महिला उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे पक्षात महापौरपदासाठी मोठी स्पर्धा आहे. अनेक इच्छुक महिला मैदानात असल्या तरी प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका कविता मुळे आणि प्रभाग क्रमांक एकच्या ज्योती कल्याणकर यांच्यातच अंतिम चुरस रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय शांभवी साले, अनुराधा काळे, सुदर्शना खोमणे, वैशाली देशमुख यांची नावेही चर्चेत आहेत.

महापौर निवडीसंदर्भात शहरातील शंकरराव चव्हाण मेमोरियल येथे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांची बैठक बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. त्यामुळे महापौरपदी कोण विराजमान होणार ते नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नव्या-जुन्याचा समन्वय साधत निर्णय घेतला गेला असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.

BJP leaders and women corporators during the Nanded Municipal Corporation meeting as the mayoral contest between Kavita Mule and Jyoti Kalyankar gains momentum under Ashok Chavan’s influence.
BJP Jalna politics : जालना महापालिकेत गटनेते, प्रतोद जाहीर; भाजपने दानवे- गोरंट्याल गटात साधला समतोल!

माळ कुणाच्या गळ्यात?

महापौर पदासाठी कविता मुळे, ज्योती कल्याणकर, सुदर्शना खोमणे, शांभवी साले, अनुराधा काळे, वैशाली देशमुख, कविता गड्डम, सदिच्छा सोनी, रुची भारतीया, अमृता ठाकूर, मनप्रीत कौर कुंजीवाले आणि सुवर्णा बसवदे यांनीही दावा केला आहे. मात्र, खासदार चव्हाण (Ashok Chavhan) यांचे दीर्घकाळ समर्थक असलेले संतोष मुळे यांच्या पत्नी कविता मुळे किंवा ज्योती कल्याणकर यापैकी एकीला संधी मिळण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

BJP leaders and women corporators during the Nanded Municipal Corporation meeting as the mayoral contest between Kavita Mule and Jyoti Kalyankar gains momentum under Ashok Chavan’s influence.
Nanded Mayor News : नांदेडमध्ये महापौर पदासाठी आठव्यांदा महिलेला संधी मिळणार; अशोक चव्हाण कोणाला संधी देणार?

इच्छुकांचा समतोल साधण्यासाठी सव्वा-सव्वा वर्षांच्या कालावधीत महापौरपदाची संधी देण्याचा पर्यायही पक्ष नेतृत्व विचाराधीन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 10 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेची विशेष सभा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com