Raosaheb Danve In Pandharpur Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve In Pandharpur : रावसाहेब दानवे वारकऱ्यांच्या भेटीला पंढरपुरात; रमले भजन-कीर्तनात...

Raosaheb Danve enjoyed himself among the varkari : भाजप नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात जावून वारकऱ्यांची भेट घेतली. वेळात वेळ काढून एक दिवस का, होईना मी पायी वारीमध्ये सहभागी होतो, असे दानवे यांनी सांगितले.

Tushar Patil

Raosaheb Danve News : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या लाखो भक्तांच्या सोबत पंढरपूरात दाखल झाल्यात. शेकडो किलोमीटर पायी प्रवास करत आज आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेत हे वारकरी धन्य होणार आहेत.

यानिमित्ताने राजकीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पहायला मिळाले. वारकऱ्यासोबत वारीत सहभागी होणे, त्यांना काय हवे नको ते पाहणे, त्यांच्यासाठी शक्य होईल ती मदत करणे यात अनेकांनी धन्यता मानली.

भाजप (BJP) नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात जावून वारकऱ्यांची भेट घेतली. दानवे यांच्या भोकरदन तालुक्यातून दरवर्षी पंढरपूरला पायी दींडी जात असते. दर्शनाला जाताना दानवे हमखास या वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतात. त्यांच्यासोबत भजन-कीर्तनात रंगून जातात आणि काही काळ त्यांच्यासोबत घालवतात. गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा यावेळीही दानवे यांनी जपली.

आमच्या घरामध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची परंपरा असल्याचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठ्या अभिमानाने "सरकारनामा"शी बोलताना सांगितले. गेल्या पसत्तीस वर्षापासून राजकारणात जरी असलो तरी पंढरपूर येथे आषाढीला येण्याची परंपरा मी कायम ठेवली आहे. सध्या दळणवळणाची साधने झाली, तरी सुद्धा वेळात वेळ काढून, एक दिवस का, होईना मी पायी वारीमध्ये सहभागी होतोच, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

रावसाहेब दानवे आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत काल पंढरपूर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मतदार संघातील कोणकोणत्या गावातून दिंड्या आल्या आहेत, याची माहिती घेतली. तसेच गावातील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिंडीप्रमुखांची नावे मिळवत त्यांच्या दिंडीला भेट दिली. आपल्या भागातील नेता शेकडो किलोमीटर दूरवर भेटला की त्याचा आनंद निराळाच असतो.

पांडुरगांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या वारकऱ्यांची रावसाहेब दानवे यांनी भेट घेत विचारपूस केली तेव्हा सगळ्यांचे चेहरे फुलले. दिंडीतील दादाराव खरात हे रावसाहेब दानवे यांचे जुने सहकारी आहेत. खरात कुटुंब हे मूळ रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा गावातील असल्याने त्यांचे ऐकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दादाराव खरात यांच्या घरात पंढरपुरची वारी करण्याची परंपरा आहे.

दानवेंनी घेतला भजनाचा आनंद

या वारीत खरात कुटुंबातील तिन्ही पिढ्या सहभागी झाल्याचे दानवे यांना समजले आणि दानवे यांनी थेट फोन करून मी तुला आषाढीला पंढरपुरात भेटायला येतो असे सांगितले. काल त्यांनी खरात व त्यांच्यासोबत वारीत सहभागी झालेल्या कुटुंबियांची व विविध ठिकाणाहून आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.वारकऱ्यांसोबत कीर्तन-भजनात दानवे रंगून गेले होते. डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, कपाळी बुक्का अशा खास वारकरी पोषाखात दानवे यांनी रात्री वारकऱ्यांची भेट घेत भजनाचा आनंद घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT