Abdul Sattar News : महायुती सरकार निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार? केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याच्या हालचाली सुरू!

Abdul Sattar On Farmers Loan Waiver : राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे माहिती, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?
Minister Abdul Sattar
Minister Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याची शक्यता आहे. राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सरकारकडून गोळा केली जात आहेत. राज्याचा आणि केंद्र सरकारचा वाटा मिळून शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

येत्या दहा दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) केंद्राकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवणार असल्याचेही सत्तार यांनी म्हटले आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार केंद्र सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

Minister Abdul Sattar
Abdul Sattar News : संभाजीराजे छत्रपती अन् इम्तियाज जलील यांना अब्दुल सत्तारांनी दिला 'हा' सल्ला!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार किती वाटा उचलू शकेल यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे कर्जमाफीसाठीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे सत्तार म्हणाले.

परंतु कर्जमाफी संदर्भातला अंतिम निर्णय केंद्र शासनाच्या मंजुरीनंतरच होऊ शकतो. याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या अनुदानाची रक्कमही काही दिवसातच त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी यावेळी दिली.

Minister Abdul Sattar
Prakash Ambedkar Big Announcement : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, 26 जुलैपासून वंचित 'आरक्षण बचाव' जनयात्रा काढणार

शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल, असाच प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारचा आहे. जिल्हा बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना पिक विमा, नुकसान भरपाई, पीक कर्ज व विविध शेती विषयक योजनांसाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com