Mla Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

MLA Sanjay Shirsat On CM : भाजपला फडणवीस मुख्यमंत्री होतील वाटतात, आम्हाला पुन्हा शिंदेच हवेत...

Marathwada News : शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता मला नाही वाटत २०२४ मध्ये दुसरा कोणी मुख्यमंत्री होईल.

Jagdish Pansare

Shivsena Political News : महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये आतापासूनच सुरू झाली आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा दावा केला आहे. यावर आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. (CM News) भाजपला जसे वाटते की पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसे आम्हालाही वाटते की पुढचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील, असा पलटवार शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला.

प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते, त्यात काही वावगे नाही, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले. आमदार अपात्रतेचा विषय तापलेला असतांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. (Shivsena) विधानसभा अध्यक्षांना जर शिंदे गटातील आमदारांवर कारवाई करावी लागली, तर अजित पवार नवे मुख्यमंत्री असतील असे बोलले जाते. त्यासाठीच गरज नसताना राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्यात आल्याचेही सांगितले जाते.

परंतु आता सध्या जी चर्चा सुरू आहे ती २०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण असेल? याची. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या नव्या वादाला सुरुवात केली आहे. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असा दावा लाड यांनी केला. त्यानंतर शिंदे गटामध्ये कुजबूज सुरू झाली आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संयमित उत्तर देत यावरून जास्त वाद होणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून आले.

प्रसाद लाड हे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे वाटणे साहजिक आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, त्यात काही गैर नाही. जसं त्या पक्षांना वाटते की, त्यांचा नेता मुख्यमंत्री होईल, तसेच आम्हालादेखील वाटते की, २०२४ मध्ये एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील.

शिंदेसाहेब ज्या पद्धतीने राज्यात काम करत आहेत, ते पाहता मला नाही वाटत २०२४ मध्ये दुसरा कोणी मुख्यमंत्री होईल, असा चिमटाही शिरसाट यांनी काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे खुद्द फडणवीस जाहीरपणे सांगत असतात. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार वेगळीच भूमिका मांडत असल्याचे दिसत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT