MLA Pradeep Jaiswal On Loksabha : संभाजीनगरची जागा आम्हीच लढवणार; मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास मीच मैदानात...

Shivsena News : लोकसभा निवडणुकीचा उमेदवार लवकरात लवकर ठरवावा, जेणेकरून त्याला वर्षभर मतदारसंघात फिरून तयारी करता येईल.
Mla Pradip Jaiswal News
Mla Pradip Jaiswal NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : लोकसभा निवडणूक वर्षभरावर आली आहे, सत्ताधारी भाजपसह राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Loksabha News) अकरा महिन्यांपूर्वी भाजपसोबत गेलेल्या शिवसेनेच्या खासदारांच्या जागा त्यांना मिळणार? की भाजप त्यावर दावा सांगणार यावरही बराच खल सुरू आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने तयारी सुरू केली आहे.

Mla Pradip Jaiswal News
MLA Pradeep Jaiswal On Thackeray : `मातोश्री` आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल कधीही वाईट बोलणार नाही..

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) हे संभाव्य उमेदवार असतील, असेही सांगितले जाते. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, प्रवक्ते संजय शिरसाट हे मात्र संभाजीनगरची जागा आम्हीच लढवणार, पक्षाने आदेश दिला तर लोकसभाही लढवू असे सांगत आहेत. राज्य पातळीवर मात्र पूर्वी (Shivsena) शिवसेनेकडे असलेले लोकसभेचे मतदारसंघ विद्यमान खासदारांसाठी भाजप सोडणार का? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांनी या विषयावर भाष्य करताना संभाजीनगर लोकसभेची जागा आम्हीच लढणार असा दावा केला आहे. एवढेच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मीच मैदानात उतरेन, असेही जैस्वाल यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यासह राज्यातील शिंदे गटासोबत गेलेल्या खासदारांबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली आहे.

एकीकडे भाजप शिवसेनेच्या मतदारसंघात तयारीला लागली आहे, तर शिंदे गटाच्या खासदारांना मात्र मुख्यमंत्र्यांनी सध्या या विषयावर काहीही बोलू नका, असे आदेश दिले आहेत. यावरही जैस्वाल यांनी स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार लवकरात लवकर ठरवावा, जेणेकरून त्याला वर्षभर मतदारसंघात फिरून तयारी करता येईल, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या जागा आधीपासून शिवसेनेकडे होत्या, जिथे आमचे खासदार आहेत, त्या जागा आम्हीच लढवणार यात शंका नाही. या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जाहीरही करतील. मी यापूर्वी खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेलो आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर मी पुन्हा लोकसभा लढवायला तयार असल्याचेही जैस्वाल यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com