Sanjay Shirsat bachchu kadu abhijeet dipke praveen darekar .jpg Sarkarnama
मराठवाडा

BJP Vs Shivsena: शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांच्या अभिजीत दिपकेंवरील 'प्रेमा'मुळे मित्रपक्ष भाजप दुखावला; आमदारानं दिला थेट इशारा

Shivsena And Abhjieet Dipke News: नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके यांची शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच भेट घेतली.

Jagdish Pansare

Shivsena-BJP Politics : नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके यांची शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागातील दिपके यांच्या घरी जाऊन या दोघांनी अभिजीत व त्यांच्या आई-वडिलांची भेट घेत चर्चा केली. शिवसेनेच्या या दिपके प्रेमावर भाजपाने अखेर आक्षेप घेतला आहे.

आमदार प्रवीण दरेकर यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत शिवसेनेच्या या कृतीमुळे महायुतीत वितुष्ट येऊ शकते, अशी भिती व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही नुकतीच अभिजीत दिपके यांची भेट घेऊन त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले होते.

या संवादात ठाकरे यांनी दिपके यांना मातोश्री भेटीचे निमंत्रण दिल्याने यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षाचे समजू शकतो, पण दुर्दैवाने संजय शिरसाट, बच्चू कडू हे जर अभिजीत दिपकेच्या घरी जात असतील तर त्यातून चांगला संदेश जाणार नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या जबादार मंत्री, आमदाराने ज्या आंदोलनाच्या नेतृत्वाने सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, त्या आंदोलनाच्या नेत्याच्या घरी जाऊन भेट घेणे हे महायुती म्हणून योग्य नाही, अशा शब्दात सुनावले. बच्चू कडू यांची भेट म्हणजे प्रसिद्धी मिळवण्यासाठीची नौटंकी असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला.

शिवसेनेकडून आमदारकी मिळवून प्रसिद्धी मिळाली नाही, म्हणून त्यांची ही उठाठेव आहे का? शिरसाट, कडू यांच्या या कृतीमुळे महायुतीतील शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकते, त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोघांना समज द्यावी, असेही दरेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT