Court Verdict : एकाच महिन्यात 2 बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा..! पुण्यानंतर सांगली न्यायालयानंही दिला 4 वर्षांच्या चिमुरडीला 'न्याय'

Pune Court News: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे (वय 65) याला न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. तसेच पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला 29 जून थेट फाशीची शिक्षा सुनावली होती.
Sangli Rape Case .jpg
Sangli Rape Case .jpgSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे (वय 65) याला न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. तसेच पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला 29 जून थेट फाशीची शिक्षा सुनावली होती.

आता एकाच महिन्याच्या कालावधीत सांगली जिल्हा सत्र न्यायालयानंही चिमुरडीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टानं सुमारे एकाच महिन्याच्या कालावधीत बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना थेट मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सांगलीतील जत तालुक्यात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे.ए. मोहंती यांनी दिला. याप्रकरणी आरोपी पांडुरंग कळळी(वय 45) याला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

जत तालुक्यातील करजगी येथे आरोपी पांडुरंग कळ्ळी यानं सव्वा चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवला होता. ही अत्याचाराची घटना फेब्रुवारी 2025 मध्ये घडली होती.

Sangli Rape Case .jpg
Modi Government: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बॅकफूटला गेलेल्या मोदी सरकारला मोठा दिलासा,राष्ट्रपतींची 'परीक्षा सुधारणा' विधेयकाला मंजुरी

घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं...?

जत तालुक्यातील करजगी येथे 6 फेब्रुवारी 2025 रोजी सव्वा चार वर्षाची चिमुरडी आठ वर्षांच्या तिच्या चुलत बहिणीसोबत सकाळी खेळत होती. याचदरम्यान, दोघीही जणी आरोपी पांडुरंग याच्या घरासमोरील झाडाखाली बदाम खाण्यासाठी गेल्या. त्याचवेळी चुलत बहिणीला तिच्या आईनं शाळेत जाण्यासाठी बोलावून घेतलं. त्यामुळे ती घरी गेली.

यानंतर चिमुरडी एकटीच असल्याची संधी साधून आरोपीनं तिला स्वत: च्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करत निर्घृण हत्या केली होती. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत दडवून ठेवला.

Sangli Rape Case .jpg
Eknath Shinde : काँग्रेस सोडलेला बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त भेट; भाजपच्या बालेकिल्ल्यात ताकद वाढणार?

या चिमुकलीचे आई-वडील मजुरीसाठी रत्नागिरी येथे असल्यामुळे तिच्या आजी-आजोबासोबत येथे राहत होती. नात दिसून येत नसल्यामुळे तिच्या आजीने शोधाशोध सुरू केला. धक्कादायक बाब म्हणजे आजीनं आरोपी पांडुरंगलाही नातीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यानं माहीत नसल्याचं सांगितलं.

यानंतर चिमुकलीबाबत उमदी पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर सहायक निरीक्षक संदीप कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाल्यावर चौकशी सुरू केली. त्यावेळी आरोपी पांडुरंगसोबत चिमुकलीला पाहिल्याची माहिती राजकुमार रेवाप्पा मेत्री याने पोलिसांना दिली. यानंतर आरोपीच्या घरात शोध घेताना लोखंडी पेटीत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.

यानंतर पोलिसांनी आरोपी पांडुरंग कळ्ळी याला तत्काळ अटक केली. त्याच्याविरूद्ध हत्या आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपअधीक्षक सुनील साळुंखे, उमदीचे सहायक निरीक्षक कांबळे यांच्या पथकाकडून करण्यात आला.

Sangli Rape Case .jpg
BJP News : महाराष्ट्रातील भाजप आमदाराच्या पतीचा शासकीय सेवेतून तडकाफडकी राजीनामा : WhatsApp स्टेटस ठेवून क्लिअर केला पुढचा मार्ग

नसरापूर घटना...

महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी महामार्ग अडवले गेले. घटनेचे गांभीर्य पाहता पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि आरोपीला अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत 15 दिवसांत एक हजार 200 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होते. विशेष न्यायालयाने 21 मेपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली. सरकारी पक्षाने मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्यासह 50 हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यानंतर गुरुवारी (दि. 25) कांबळेला या प्रकरणात दोषी ठरविले होते. तर आज न्यायालयाने आपला अंतिम निकाल जाहीर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com