Vidhan Parishad Election 2026 : जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरून महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे. युतीमध्ये 2018 मध्ये ही जागा शिवसेनेने लढली आणि जिंकली होती. परंतु आता दोन्ही जिल्ह्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संख्याबळाच्या आधारावर भाजपने या जागावर दावा सांगितला आहे.
"संख्याबळ आमचे आहे, जागा आम्हाला द्या, हट्ट सोडा, अन्यथा महापालिका, जिल्हा परिषदेप्रमाणे आम्ही ही जागाही स्वबळावर लढून जिंकू शकतो", असा थेट इशारा भाजपच्या नेत्यांनी शिंदेसेनेला दिला आहे. भाजपने ही जागा संख्याबळाच्या आधारावर मागीतली आहे. इथे दबावाचा विषयच नाही. आमचे संख्याबळ सहाशे पैकी 275 एवढे आहे. शिवसेनेकडे फक्त 125 मतदार आहेत.
निवडणूका या संख्याबळावर लढवल्या आणि जिंकल्या जातात. हा निकष लावला तर भाजपचा या जागेवरील दावा हा नैसर्गीक आहे. उलट शिवसेनेकडून दबावाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी केला. उमेदवार निवडून येण्यासाठी 301 मतांची गरज आहे. पैकी भाजप आणि मित्रपक्षांचे तीस-पस्तीस मतदारांची बेरीजही तेवढी होते.
शिवसेनेकडे सक्षम उमेदवारही नाही, तेव्हा त्यांनी या जागेचा आग्रह सोडावा, अशी मागणीही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा मागीतली आहे. संख्याबळ आपले आहे, जागा आपल्यालाच मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्यांच्या भेटीत दिले असल्याचेही शितोळे, बस्वराज मंगरुळे यांनी सांगितले.
महापालिका, जिल्हा परिषदेत शिंदेसेनेने हट्ट केला, ताठर भू्मिका घेतली. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढलो आणि दोन्ही ठिकाणी बहुमताने सत्ता आणली. तीच तयारी आमची विधान परिषदेसाठीही आहे. शिंदेसेनेने संख्याबळाचा आदर करून जालना-छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला सोडून युती धर्म पाळावा, असा सल्लाही किशोर शितोळे यांनी यावेळी दिला. या उपरही आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असेही भाजपने स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.