Parbhani Loksabha Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency : परभणी लोकसभेवर दावा सांगत भाजप शिंदे गटाला देणार धक्का..

BJP News : यापुर्वीच्या खासदाराला परतुर, घनसावंगी विधानसभा मतदार संघातून प्रत्येक निवडणूकीत आघाडी आम्ही दिल्यामुळे ते निवडून येत होते.

Jagdish Pansare

Marathwada Political News : शिवसेना शिंदे गट आणि त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले खासदार यांचे पुढे काय? असा प्रश्न सध्या उपस्थितीत केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी उठाव केला. (BJP Political News) राज्यात शिंदे-भाजपचे एकत्रित सरकार आले. दिल्लीत शिंदे गटाच्या खासदारांचा मोदी सरकारला विधेयक मंजुर करण्यासाठी फायदा झाला. पण त्याच खासदारांना आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माजी करण्याचा कार्यक्रम भाजपकडून राबवण्यात येतो की काय? अशी कुणकुण सुरू झाली आहे.

त्याला कारण शिंदे गटाचे किंवा ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघावर आता (BJP) भाजपकडून दावा सांगितला जातोय. महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, (Parbhani) परभणी या लोकसभा मतदारसंघात भाजपने स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. भाजपचे आमदार, खासदार, राज्यातले आणि केंद्रातील मंत्रीही इथे आमचाच खासदार निवडून येणार असा दावा करतांना दिसत आहेत.

यात माजीमंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांचीही भर पडली आहे. परभणीमध्ये व्यापारी संघटनांच्या बैठकीत इथून भाजपचाच खासदार निवडून येणार असा दावा लोणीकर यांनी केला. त्यामुळे शिंदे गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे जाधव यांना टक्कर देऊ शकेल असा तगडा उमेदवार भाजप शोधत आहे.

तिकडे शिंदे गट पुर्वी ठाकरे गटाकडे असलेल्या सगळ्या मतदारसंघात आम्हीच लढणार असे सांगत असले तरी त्यात आत्मविश्वास जाणवत नाही. याउलट भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी मात्र `डंके की चोट पर` आमचाच खासदार परभणीतून निवडून येणार असे जाहीरपणे सांगत आहेत. बबनराव लोणीकर हे भाजपकडून इच्छूक असलेल्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे महिनाभरातच स्पष्ट होईल.

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीत परभणी लोकसभेचा खासदार हा कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचाच असेल, अस लोणीकर यांनी व्यापारी संघटनांच्या बैठकीत ठणकावून सांगितले. त्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून हा लोकसभा मतदार संघ भाजपाला देण्याची आग्रही मागणी करणार असल्याचेही लोणीकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची माहिती देतांना पुढील काळात परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका पूर्ण ताकदीने लढण्याकरीता व विजयी होण्याकरीता ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील वाड्यावरील लहान थोर सर्व कार्यकर्त्याना बळ देण्याचा आपण प्रयत्न करु. यापुर्वीच्या खासदाराला परतुर, घनसावंगी विधानसभा मतदार संघातून प्रत्येक निवडणूकीत आघाडी आम्ही दिल्यामुळे ते निवडून येत होते. परभणी हा हिंदुत्ववादी मतदार संघ असल्यामुळे भाजपाचाच खासदार इथून विजयी होईल, याचा पुनरुच्चारही लोणीकर यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT