Aditya Thackeray Visit Nanded : खासदाराने स्वच्छतागृह साफ करायला लावले, त्या अधिष्ठात्यांचा ठाकरेंकडून योग्य सन्मान...

Nanded Political News : अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्याशी रुग्ण संख्या, मृत्यू दर, उपलब्ध औषध साठा, औषधांची मागणी व पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा केली.
Aditya Thackeray Visit Nanded
Aditya Thackeray Visit NandedSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाच दिवशी नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभरात संताप पसरला होता. (Nanded Visit News) आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, जिल्हा प्रशासन, रुग्णालयाचे अधिष्ठाता या सगळ्यांवरच राग व्यक्त होत होता. शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार यांनी तर अधिष्ठाता वाकोडे यांना चक्क स्वच्छतागृह साफ करायला लावले.

Aditya Thackeray Visit Nanded
Aditya Thackeray On Tanaji Sawant : राजीनामा देण्याची हिंमत नाही, किमान जबाबदारी झटकू नका...

डीन यांच्याबद्दल एकाच दिवशी झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूबद्दल राग असणे समजू शकतो, पण तो अशा पद्धतीने काढणे कुणालाही रुचले नाही. (Shivsena) खासदार पाटील यांनी ज्या अधिष्ठाता डाॅ. श्याम वाकोडे यांना स्वच्छतागृह साफ करायला लावले, त्याच डीन वाकोडे यांच्या पदाचा योग्य सन्मान राखत युवासेनेचे अध्यक्ष माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्याकडून नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील आढावा घेतला.

तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी डीन वाकोडे यांच्यासोबत केलेल्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आज प्रत्यक्ष नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वाकोडे यांच्याकडून संपूर्ण माहिती घेत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी ठाकरे यांनी आज केली. या वेळी अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्यासह रुग्ण संख्या, मृत्यू दर, उपलब्ध औषध साठा, औषधांची मागणी व पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा केली. रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर होणाऱ्या उपाययोजना जाणून घेत काही दिवसांपूर्वी उदभवलेल्या गंभीर स्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता आवश्यक उपाययोजनांबाबत ठाकरेंनी डीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, अधिष्ठाता वाकोडे यांना खासदार हेमंत पाटील यांनी स्वच्छतागृह साफ करायला लावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर समाजमाध्यमांवर खासदार पाटील समर्थकांनी त्यांच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्याने या वादाला राजकीय वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने अधिष्ठातांच्या पदाचा मान राखला, त्याची चर्चा होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com