BJP District President News Sarkarnama
मराठवाडा

BJP District President News : भाजपची नवी खेळी ; बोराळकर कायम, ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्ष..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : भाजपच्या नव्या जिल्हा व शहराध्यक्षांच्या निवडीनंतर पक्षातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (BJP District President News) मराठवाड्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपने नवी खेळी करत ग्रामीण भागात दोन जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. शिरीष बोराळकर यांची नऊ महिन्यापुर्वीच शहराध्यक्ष पदावर निवड झाली होती. त्यामुळे त्यांना या पदावर कायम ठेवण्यात आले आहे.

तर संभाजीगर ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्षपदी सुहास शिरसाट, तर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संजय खांबायते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (BJP) मोठ्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. (Aurangabad) राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या संघटनेत देखील दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रथा सुरू झाल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

छत्रपती संभाजीगनर जिल्ह्यातील शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे यांची छाप आहे. (Marathwada) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता अधिकाधिक पदाधिकाऱ्यांना खूष करण्याचा प्रयत्न म्हणून देखील या निवडीकडे बघितले जात आहे.

शिरीष बोराळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांना कायम ठेवल्यामुळे त्यांच्यामार्फत जिल्ह्यावर फडणवीसांचा अंकुश राहणार आहे. संभाजीनगर ग्रामीण उत्तर भागातील फुलंब्री, सिल्लोड, पैठण भागाची जबाबदारी फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे संचालक असलेल्या सुहास शिरसाट यांच्याकडे देण्यात आली आहे.

हे तीन्ही तालुके भौगोलिक दृष्टा संभाजीनगरात येते असले तरी लोकसभेला ते जालना मतदारसंघात येतात. सुहास शिरसाट हे आमदार हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. तर ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष म्हणून संजय खांबायते यांच्याकडे कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्याची जबाबदारी असेल. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांचे विश्वासू अशी खंबायते यांची ओळख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT