BJP District President News : नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर आमदार बोर्डीकरांची पकड मजबूत..

Marathwada Political Marathi News: दोघांनाही पक्षातून फारशी स्पर्धा नसल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
MLA Bordikar
MLA BordikarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Politics Marathi News: परभणी लोकसभा मतदारसंघात पक्षाला आणखी ताकद देण्याच्या दृष्टीने भाजपने जिंतूरच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने केलेल्या जिल्हा व शहरअध्यक्षांच्या निवडीनंतर बोर्डीकर यांची जिल्ह्यावरील पकड आणखी मजबूत होणार असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

MLA Bordikar
BJP District President News: ठाकूर सक्रिय झाल्याने चालुक्य यांची जिल्हाध्यक्षपदी निवड..

गेल्यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढलेले संतोष मुरकुटे आता जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे २०२४ मध्ये ते (BJP) भाजपचे गंगाखेडचे उमेदवार असतील असे बोलले जाते. तर राजेश देशमुख यांच्यावर पक्षाने परभणी (Parbhani) शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. मुरकुटे हे वंजारी समाजाचे तर देशमुख मराठा असा समतोल या निवडीतून साधण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठीने केल्याचे बोलले जाते.

राज्यात घडलेल्या घडामोडी, सत्तांतर, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा सहभाग या पार्श्वभूमीवर भाजपच्या शहर व जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. (Marathwada) परभणी जिल्हा व शहराध्यक्षपदी निवड झालेले दोन्ही चेहरे फारसे चर्चेत नसले तरी जिल्हा आणि राज्यातील नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

यापुर्वी शिवसेनेसोबतच्या युतीमुळे भाजपला या मतदारसंघात लढता आले नाही. परंतु आता शिवसेनेत फूट पडून शिंदे गट भाजपसोबत असल्याने आधी शिवसेना लढवत असलेल्या काहीी मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यापैकीच एक परभणी मतदारसंघ आहे. जिंतूरच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर लोकसभा लढवण्यास इच्छूक असल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने मुरकुटे आणि देशमुख यांची अनुक्रमे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष म्हणून झालेली निवड महत्वाची समजली जाते. या दोघांनाही पक्षातून फारशी स्पर्धा नसल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य संतोष मुरकुटे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व असलेले व आगमी निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या संतोष मुरकुटे यांची जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करून पक्षाने एका अर्थाने हिरवा कंदीलच दाखवला असे म्हणावे लागेल. त्यांचा या विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आणि संघटन आहे. शहर महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख हे पक्षातील नवा चेहरा म्हणून ओळखले जातात. यापुर्वीचे महानगरप्रमुख भरोसे यांचे विश्वासू असलेल्या देशमुख यांच्यावरही पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com