NEET result news : एकीकडे नीट पेपर फुटीप्रकरणी राजधानी दिल्लीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे फेरपरीक्षेचा निकालही संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. 16 जुलै रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मराठवाड्यातील बीडमध्ये काही विद्यार्थ्यांनी उत्तरसूची आणि ओएमआर शीटमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत आपल्याला कमी गुण मिळाल्याचा दावा करत आहेत.
एवढेच नाही तर या निकालाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार बीडमधील दोन विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. बीडमधील दोन विद्यार्थ्यांनी एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवरच आरोप केले आहेत.
एका विद्यार्थ्याला नीट परीक्षेत 522 गुण अपेक्षित असताना स्कोअरकार्डवर अवघे 95 गुण मिळाले, तर दुसऱ्या विद्यार्थिनीला 702 पेक्षा अधिक गुण अपेक्षित असताना केवळ 87 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला.
बीडच्या शुभम गवते याने नीट 2026 ची परीक्षा दिली होती, त्याची अँन्सर की आणि ओ.एम.आर.शीट पाहता जास्त मार्क मिळायला हवे होते. मात्र, त्याला अवघे 95 गुण मिळाले आहेत. त्यामुळे, आपल्या निकालाबाबत गोंधळ झाल्याचा आरोप करत त्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
याबाबत आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने परीक्षा घेणाऱ्या एनटीएला नोटीस बजावली आहे. तसेच, त्या दोन्ही विद्यार्थ्यांची मूळ उत्तरपत्रिका कोर्टात सादर करायलाही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच, एक आठवड्यात उत्तर पत्रिका न्यायालयात द्यायची आहे, त्यानंतर पुढील सुनावणी होईल, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील महेंद्र पंडितराव गंडले यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.