Dhananjay Munde
Dhananjay Munde  sarkarnama
मराठवाडा

राजकीय वाटचालीत ब्राम्हण समाज सावलीसारखा माझ्यासोबत: त्या घटनेवर मुंडेंचे स्पष्टीकरण

सरकारनामा ब्यूरो

बीड : आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'कन्यादान विधी', वैदिक मंत्र, समाज याविषयी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे, मात्र जात-पात-धर्म याबाबतीत भेद करणे आमच्या अंगालाही शिवणार नाही, मात्र, माध्यमांमधून मिटकरींनी केलेल्या व्यक्तिगत मतावरुन प्रतिक्रिया देताना आम्ही पाठीमागे हसतोय म्हणून दोष दिला जातो हे चुकीचे आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही किंवा पक्षाची भूमिका म्हणून मिटकरी बोलत नव्हते तर एका लग्नसमारंभातील प्रसंग त्यांनी आपल्या भाषणात सांगितला. तरीही यातूनही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले आहे.

ब्राम्हण समाजातील माझे असंख्य सहकारी दोन पिढ्यापासून सावलीसारखे आपल्या सोबत आहेत आणि ब्राह्मण समाजातील लोक पाठीशी उभे राहिले त्या पाठबळावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. याची परिपुर्ण जाणिव आपल्याला आहे. माझ्या राजकीय वाटचालीत आमच्या परळीचे ब्राम्हण समाजातील प्रथम नगराध्यक्ष म्हणून माझे सहकारी बाजीराव धर्माधिकारी यांना संधी दिली. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखविण्याचा यत्किंचितही हेतू आपल्या मनात येऊ शकत नाही. मिटकरींना आपण बोललो असून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याने योग्यवेळी त्याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही मुंडेंनी स्पष्ट केले.

मिटकरी यांनी व्यक्तीगत भाष्य केलेले आहे. याविषयी स्पष्टिकरण देण्याची गरज असल्याचे आपण त्यांना सांगितले आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखविण्याचा विचार आपल्या मनात कधी येतो ना यापुर्वी असे काही घडलेले नाही. तरीही याबाबतीत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो. परंतु सर्वांना सोबत घेत जातीपाती विरहीत वाटचाल सुरू असून सुरु राहील, असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT