Bharat Jodo Rally In Maharashtra news, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Bharat Jodo : आजी, वडिलांना भेटलेल्या वृंदा शेरे अखेर नातू राहूल गांधींना भेटल्याच..

शेरे शाळेत असतांना इंदिरा गांधी यांना भेटल्या होत्या. तर महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना त्यांना राजीव गांधी यांना भेटण्याचा योग आला होता. (Bharat Jodo)

रश्मी पुराणिक

नांदेड : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. राहुल गांधी यांचा साधेपणा, सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी, मजुरापासून ते अबाल-वृध्दापर्यंत सर्वांना सोबत घेत ते निघाले आहेत. गांधी घराण्याबद्दल स्वातंत्र्य काळापासूनच सामान्यांना मोठे आकर्षण राहिलेले आहे. अशाच गांधी घराण्याबद्दल आकर्षण असलेल्या आणि या आधी स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना भेटलेल्या नाशिकच्या वृंदा शेरे गांधी परिवारातील तिसऱ्या पिढीला म्हणजेच राहूल गांधींनाही भेटल्या.

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या शेरे यांनी पदयात्रे दरम्यान राहुल यांना भेटण्याचा दोनदा प्रयत्न केला. (Rahul Gandhi) पण त्यांच्या भोवती असलेल्या सुरक्षेमुळे त्यांना ते शक्य झाले नव्हते. पण म्हणतात ना कोशिश करने वालो की कभी हार नही होती, अगदी तसंच वृंदा शेरे याचा तिसरा प्रयत्न यशस्वी ठरला आणि त्या राहुल गांधी यांना भेटल्या. (Congress) वयाच्या ५७ व्या वर्षी झालेली ही भेट अविस्मरणीय असल्याचे त्या सांगतात.

शेरे शाळेत असतांना इंदिरा गांधी यांना भेटल्या होत्या. तर महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना त्यांना राजीव गांधी यांना भेटण्याचा योग आला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना भेटण्याची त्यांची इच्छा भारत जोडोच्या निमित्ताने पुर्ण झाली आहे. आज सकाळी यात्रा सुरू झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नांत त्या राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरल्या.

यावेळी त्यांनी राजीव गंधी यांनी पाठवलेले पत्र देखील राहुल यांना दाखवले. यावेळी राहुल यांनी वृंदा यांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली. वृंदा शेरे या ग्रेट भेटीमुळे चांगल्याच भारावल्या होत्या. या भेटीबद्दल आपल्या भावना व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, हा जर पप्पू आहे, तर याच्या बरोबर इतके पप्पू चालत आहेत. मग खरे पप्पू कोण?

आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर देश अडचणीत असताना राहुल गंधी यांच्या यात्रेत सहभागी होऊन जबाबदारी निभावली. काहीतरी करावं म्हणजे पुढची पिढी आपल्याला लक्षात ठेवेल म्हणून भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे त्या सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT