Bharat Jodo : पांडेंच्या निधनाने हळहळ , पण दुःख बाजूला सारत पदयात्रा सुरूच होती..

पदयात्रेत उत्साह होता, मात्र पांडे यांच्या आकस्मिक मृत्यांच्या दुःखाची किनार देखील पहायला मिळाली. (Bharat Jodo)
Bharat Jodo Rall In Nanded News
Bharat Jodo Rall In Nanded NewsSarkarnama

देगलूर : मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत आज दुःखद घटना घडली. सेवादलाचे ज्येष्ठ नेते के.के. पांडे यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे यात्रेवर शोककळा पसरली, राहुल गांधी यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही हळहळले. पण पांडे यांना श्रद्धांजली वाहून सायंकाळी पुन्हा पदयात्रेला प्रारंभ झाला.

Bharat Jodo Rall In Nanded News
Bharat Jodo Yatra: 14 दिवस, 384 किलोमीटर, असा असेल राहुल गांधींचा महाराष्ट्रातला प्रवास

भारत जोडो यात्रेने सोमवारी (ता. आठ) महाराष्ट्रात प्रवेश केला. मंगळवारी या यात्रेचा ६२ वा दिवस होता. विश्रांतीनंतरच्या दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. (Congress) सायंकाळी साडेपाच वाजता यात्रा मार्गावरील एका शेतकऱ्यांच्या घरात जात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) या कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

त्यानंतर साडेसाडे सहा वाजता भोपाळा पाटी येथील शोकसभेत के. के. पांडे यांना श्रद्धांजली अर्पण करत राहुल गांधी यांनी पुन्हा पदयात्रेला प्रारंभ केला. खतगावफाटा येथून दुपारी चार वाजता या पदयात्रेला सुरुवात झाली.

राहुल गांधी यांच्यासोबत प्रमुख नेते, कार्यकर्ते पायीच चालत होते. पण, जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी मात्र पायी न चालता वाहनाने यात्रेच्या मागे येतांना दिसले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही थोडा वेळ राहुल यांच्या सोबत पायी चालले. ‌नंतर मात्र ते वाहनात जाऊन बसले.

राहुल गांधी यांच्या भोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. ते वेगाने चालत होते, त्यांना पाहता यावे यासाठी आजूबाजूच्या शेतातील तरुण यात्रेच्या दिशेने येत होते. यात्रेत अनेक ज्येष्ठांनी पहिल्या दिवसाची यात्रा पायी पूर्ण केल्याचे देखील दिसून आले. पदयात्रेत उत्साह होता, मात्र पांडे यांच्या आकस्मिक मृत्यांच्या दुःखाची किनार देखील पहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com