BRS Offer Kendrekar News 
मराठवाडा

BRS Offer kendrekar : राजकारण ! नको रे बाबा, केंद्रेकरांनी बीआरएसची ऑफर नाकारली..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : प्रशासकीय सेवेत अनेक वर्ष काम केल्यानंतर बरेच अधिकारी निवृत्तीनंतर आपली दुसरी इनिंग राजकारणातून सुरू करतात. अगदी न्यायाधीशांपासून ते पोलिस व इतर विभागातील बडे अधिकारी निवृत्तीनंतर राजकारणाच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. (BRS Offer kendrekar) ३ जुलै २०२३ रोज प्रशासकीय सेवानिवृत्ती घेतलेले माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे देखील राजकारणात जाणार अशा चर्चांना तेव्हा उधाण आले होते.

स्वेच्छा निवृत्तीपुर्वी काही दिवस आधीच त्यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपयायोजना सुचवणारा सविस्तर अहवाल सादर केला होता. (Aurangabad) या अहवालावर तेलंगणा राज्यातील बीआरएस पक्षाचा प्रभाव असल्याची टीका झाली होती. (Marathwada) अर्थात नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने केंद्रेकर यांचा तो अहवाल फेटाळला, तो स्वीकारणे शक्य नसल्याचे सांगितले.

परंतु शेतकऱ्यांसाठी केंद्रेकरांनी सुचवलेल्या शिफारशी व त्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास याचे कौतुक आणि अभिनंदन करण्याठी बीआरएसचे महाराष्ट्रातील प्रमुख माणिक निकम यांनी नुकतीच केंद्रकरांची भेट घेतली. (Parbhani) परभणी जिल्ह्यातील झरी या त्यांनच्या मुळगावी शेतात ही भेट झाली. या भेटीत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली.

आपल्या प्रशासकीय सेवेचा अनुभव राज्यातील गोरगरिब शेतकरी आणि जनतेच्या कल्याणासाठी व्हावा, म्हणून आपण बीआरएस पक्षात यावे, अशी विनंती देखील निकम यांनी केल्याची माहिती आहे. मात्र केंद्रेकर यांनी बीआरएसमध्ये येण्याची त्यांची ऑफर नम्रपणे नाकारली. आपल्याला राजकारणात रस नसल्याचे केंद्रेकरांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर शेतीत रमणार असल्याचे केंद्रेकरांनी आधीच स्पष्ट केले होते.

शेती करायला मला खूप आवडते, त्यामुळे यापुढचा सर्वाधिक काळ हा शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यात घालवणार आहे. या शिवाय अध्यात्मात देखील मी रमणार आहे. प्रशासकीय सेवेत काम करतांना कायम सर्वसामान्याच्या हिताचा ध्यास घेवून काम केले. त्यामुळे निवृत्तीनंतर देखील शेती, अध्यात्मासोबतच समाज सेवेला माझे प्राधान्य असेल, असे केंद्रकरांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजुर झाल्यानंतर सांगितले होते. सध्या तरी ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी नाकारलेल्या ऑफरवरून दिसून येते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT