Latur Political : देशमुखांचा `काॅन्फिडन्स`, लातूरचा खासदार काॅंग्रेसचाच..

Congress News : चाकूरकर यांच्या नावावर सातवेळा निवडून जाण्याचा विक्रम आहे. २००४ मध्ये लातूरकरांनी भाकरी फिरवली.
Latur Political News
Latur Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : निलंगा येथील काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि धोंडेजेवण कार्यक्रमात जोरदार बॅटिंग करत धमाल उडवून देणाऱ्या माजी मंत्री अमित देशमुख यांचा `काॅन्फिडन्स`, सध्या चांगलाच वाढला. (Latur Political) लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पत्रकरांशी बोलतांना तो दिसून आला.

Latur Political News
Latur Political : देशमुख म्हणतात, सध्या काळ अन् कपाळ दोन्हीची साथ नाही !

लातूरचा (Latur) पुढचा खासदार निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा निवडून येईल, शिवाय विधानसभा आमदारांची संख्या ही वाढणार असल्याचा दावा देशमुख (Amit Deshmukh) यांनी केला. लातूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सर्वाधिक काळ या जिल्ह्यावर काॅंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. तुळशीराम कांबळे, शिवराज पाटील चाकूरकर आणि जयंत आवळे यांनी आतापर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

चाकूरकर यांच्या नावावर तर सातवेळा निवडून जाण्याचा विक्रम आहे. (Congress) २००४ मध्ये लातूरकरांनी खऱ्या अर्थाने भाकरी फिरवली आणि भाजपच्या रुपाताई पाटील निलंगेकर खासदार झाल्या. पण पुढच्याच निवडणुकीत म्हणजे २००९ मध्ये काॅंग्रेसने कमबॅक करत जयंत आवळे यांना निवडूनआणले. पण ही कामगिरी काॅंग्रेसला २०१४ च्या मोदी लाटेत कायम राखता आली नाही. भाजपच्या सुनिल गायकवाड यांनी लातूरमधून विजय मिळवला.

मोदी लाटेचे तडाखे काॅंग्रेसला २०१९ मध्येही बसले. नवख्या सुधाकर श्रृंगारे यांनी विजय मिळवत काॅंग्रेच्या मच्छिंद कामंत यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे कर्नाटक राज्यातील विजयामुळे देशमुखांचा आत्मविश्वास बळावला असला तरी मतदारसंघातील वस्तुस्थिती त्यांच्या बाजूने नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर सध्या लातूर शहर आणि ग्रामीण हे दोन मतदारसंघ सोडले तर जिल्ह्यातील चार मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी तर एका जागेवर पीडबल्यूपीआय पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे अमित देशमुख यांनी लोकसभा निरीक्षकांना खूष करण्यासाठी तर हा दावा केला नाही ना ? अशी चर्चा होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com