K. Chandrasekhar Rao Rally News Sarkarnama
मराठवाडा

BRS Rally News : मुख्यमंत्री केसीआर यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन अन् उमेदवारीवर शिक्कामोर्तब ?

Chhatrapati Sambhajinagar : आता सभेच्या निमित्ताने या नेत्यांची ताकद देखील केसीआर तपासून पाहणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Politics : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मराठवाड्यातील तिसरी जाहीर सभा येत्या २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात होत आहे. नांदेडनंतर बीआरएसला (BRS) सर्वाधिक पाठबळ हे याच शहरातून मिळाले आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, अण्णासाहेब माने, संतोष माने, कदीर मौलाना, अभय पाटील चिकटगांवकर अशा अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

आता त्यांचे समर्थकही जाहीर सभेच्या दिवशी बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यातील ज्या नेत्यांचे प्रवेश बीआरएसमध्ये झाले आहेत, ते सगळे हैदराबादेत मुख्यमंत्री केसीआर (K.Chandrashekahr Rao) यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथे औपचारिक प्रवेश केल्यानंतर आता या सगळ्यांचा जाहीर प्रवेश सभेच्या माध्यमातून केला जाणार आहे. बीआरएसच्या महाराष्ट्र निरिक्षकांनी दिलेली माहिती आणि नेत्यांना असलेला पाठिंबा या आधारे हे प्रवेश झाले होते.

आता सभेच्या निमित्ताने या नेत्यांची ताकद देखील केसीआर तपासून पाहणार आहेत. (Marathwada) शहरातील आमखास मैदानावर ही जाहीर सभा सांयकाळी ६ वाजता होणार आहे. (Harshvardhan Jadhav) माजी आमदार हर्षवर्धन जाधव, कदीर मौलानासह अन्य स्थानिक नेत्यांनी सभेची तयारी सुरू केली असली तरी केसीआरचे विश्वासू आमदार, खासदार हेच या तयारीचा सर्वात मोठा वाटा उचलत आहेत.

नुकतेच बीआरएसमध्ये दाखल झालेले माने पिता-पुत्रही आता या सभेच्या निमित्ताने तयारीला लागल्याचे चित्र आहे. समर्थकांचे प्रवेश करून घेण्याचा धडाका संतोष माने यांनी आपल्या संपर्क कार्यालयात आणि तालुक्यात सुरू केला आहे. तिकडे जाधव यांनी देखील असाच प्रयोग कन्नड-सोयगांव मतदारसंघात केला.

आता सभेच्या निमित्ताने केसीआर यांच्यासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन करून हे नेते विधानसभा उमेदवारीसाठी दावे करणार आहेत. गंगापूरमधून संतोष माने, कन्नड-हर्षवर्धन जाधव, वैजापूर- अभय पाटील चिकटगांवकर तर शहरातील मध्य मतदारसंघातून कदीर मौलाना हे इच्छूक आहेत. त्यामुळे केसीआर यांच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून घेण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT