Atique, Ashraf Poster News : अतिक, अश्रफला शहिद ठरवणारे बॅनर झळकले..

Marathwada : या दोघांनाही स्वर्गात जागा मिळावी, असे बॅनरवर नमूद करण्यात आले होते.
Atique Ahmed Murder Case News
Atique Ahmed Murder Case NewsSarkarnama

Beed : उत्तर प्रदेशातील कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atique Ahmad) व त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज येथे दोन दिवसांपुर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याचे राजकीय पडसाद देशभरात उमटले आणि योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. बीड जिल्ह्यातील माजलगांव शहराच्या एका चौकात अतिक आणि अश्रफला शहिद ठरवणारे आणि त्याच्या हत्येचा निषेध करणारे बॅनर झळकल्याने एकच खळबळ उडाली.

Atique Ahmed Murder Case News
Mumbai News : 'मिशन लोटस्'च्या अफवेनंतर मंत्रालयात 'यांचा' सुळसुळाट ; फायलींचा होतोयं जलद 'निपटारा'

पोलिसांनी वेळीच हे बॅनर हटवले आणि संबंधितावर कारवाई करत दोंघाना ताब्यात घेतले आहे. (Beed) युपीमध्ये योगी सरकारच्या पोलिसांनी अतिक याचा मुलगा असद व त्याच्या साथीदाराचे एन्काउंटर केल्याने विरोधकांनी टीका केली होती. (Maharashtra) असदचा दफनविधी होत नाही तोच दुसऱ्या दिवशी अतिक आणि अश्रफ यांना प्रयागराज येथे रुग्णालयात तपासणीसाठी नेत असतांना दोघांवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या घटनेनंतर उत्तर प्रदेशात तणावाचे वातावरण असतांना इकडे माजलगांवमध्ये या दोघांना शहिद बनवणारे बॅनर लागल्याने तणावाचे वातावरण होते. (Uttar Pradesh) आंबेडकर चौकात हे बॅनर लावण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. अतिक व अश्रफ यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले होते, त्यावर या दोघांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. या दोघांनाही स्वर्गात जागा मिळावी, असे बॅनरवर नमूद करण्यात आले होते.

बीडमधील एका स्थानिक दैनिकाचे कात्रण देखील बॅनरवर ठळकपणे छापण्यात आले होते. पोलिसांनी प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने नगर पालिकेच्या मदतीने सकाळी साडेदहाच्या सुमारास बॅनर काढून घेतले. पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी ही कारवाई केली. तसेच गेवराईचे उपविभागीय अधिकारी राठोड हे याची अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, बॅनर प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी करणारे निवेदन बंजरंग दलाच्या वतीने देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com