Buldhana Sarpanch Death : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला असून, या व्हिडिओमध्ये राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.
दीपक उगले यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या शेतात हा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी वैभव पाटील उर्फ भैया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "वैभव पाटील उर्फ भैया याच्या जाचाला कंटाळून मी माझं आयुष्य संपवत आहे," असे उगले यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
गेल्या तीन वर्षांपासून वैभव पाटील हे आपल्यावर सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप दीपक उगले यांनी केला आहे. "तू राजीनामा दे, मला सरपंच व्हायचं आहे," असे म्हणत आपल्याला वारंवार त्रास दिला जात असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले.
तसेच, आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोपही उगले यांनी केला आहे. फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटूनही आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या सततच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.
दीपक उगले हे करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी केलेला व्हिडिओमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.