Saam Next Gen Reporter : तुम्ही जागरूक आणि सजग विद्यार्थी आहात? तुमच्या गावात, शाळेत किंवा परिसरात एखादी नागरी समस्या आहे? रस्ते खराब आहेत, पाणी मिळत नाही, वीजेचा प्रश्न आहे, शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता किंवा बसची सुविधा नाही? शाळेतील शैक्षणिक समस्या, पुस्तकांचा वाढता भार, निकृष्ट जेवण किंवा शिक्षणाचा दर्जा यांसारख्या समस्या तुम्हाला जाणवत आहेत?
मग आता या समस्यांकडे दुर्लक्ष होणार नाही. कारण या समस्या जगासमोर मांडण्यासाठी साम टीव्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक अनोखे व्यासपीठ - Next Gen Reporter!
तुमच्या परिसरातील समस्या तुम्हीच कॅमेऱ्यात कैद करा, त्याची एक रील तयार करा आणि ती साम टीव्हीकडे पाठवा. तुमचा आवाज थेट प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
साम टीव्हीचा अनोखा उपक्रम
वृत्तवाहिन्यांच्या विश्वात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा उपक्रम राबवला जात आहे. Next Gen Reporterच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील सामाजिक आणि नागरी प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे.
गावातील समस्या असो, शाळेतील प्रश्न असो किंवा शाळेत जाताना येणाऱ्या अडचणी असोत — त्या तुम्ही स्वतः रिपोर्ट करू शकता. तुम्हीच तुमच्या परिसराचा आवाज बना आणि समस्या थेट जगासमोर मांडा!
कोण होऊ शकतो Next Gen Reporter?
तुम्ही जर सजग आणि जागरूक विद्यार्थी असाल, तर तुम्हीही Next Gen Reporter होऊ शकता.
इयत्ता ८वी ते ११वीमध्ये शिकणारे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
यासाठी तुम्हाला पत्रकारितेचा अनुभव असण्याची गरज नाही. तुमच्या परिसरातील समस्या ओळखा, त्यावर एक रील तयार करा आणि ती साम टीव्हीकडे पाठवा.
तुमची रील कुठे पाठवायची?
तुमची माहिती आणि तुमच्या गावातील किंवा परिसरातील समस्येवरील रील खालील माध्यमातून पाठवा —
📧 studentreporter@saamtv.com
📱 WhatsApp : 9594885566
रीलसोबत तुमची माहिती आणि तुम्ही कोणत्या गावातून किंवा परिसरातून रिपोर्ट करत आहात, याची माहिती पाठवा.
सर्वोत्तम रिपोर्टिंगला मिळणार बक्षीस!
दर महिन्याला सर्वोत्तम रिपोर्टिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक देण्यात येणार आहे.
म्हणून फक्त समस्या पाहू नका...
ती कॅमेऱ्यात कैद करा, तिचा आवाज बना आणि व्यवस्था बदलण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हा!
आजचा विद्यार्थी, उद्याचा Reporter!
Next Gen Reporter बना आणि तुमच्या परिसराचा आवाज थेट जगासमोर पोहोचवा!