water crisis In Chhatrapati Sambhajinagar News Sarkarnama
मराठवाडा

Water Issue News : सत्ताधाऱ्यांनी वाट लावली, प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांनीही पाण्याचे बारा वाजवले!

The water crisis in Sambhajinagar isn’t just a political failure—bureaucrats also share the blame. : वीस वर्षात तब्बल 13 आयुक्त होऊन गेले. राजकारण्यांच्या चांगल्या वाईट निर्णयांना फक्त मान डोलवण्याचे काम करून या आयएएस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी वेळकाढू भूमिका घेतली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्याची सत्ताधाऱ्यांनी वाट लावली. लोकाना पाणी न मिळण्याला जसे राजकीय नेते, पदाधिकारी जबाबदार आहेत, तसे प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी तेवढेच जबादार आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत चुकीच्या निर्णयांना मान झुकवत दिलेल्या पाठबळामुळेच आज नागरिकांना पाण्यासाठी बारा-बारा दिवस वाट पहावी लागते. खऱ्या अर्थाने संभाजीनगरच्या पाण्याचे बारा वाजवण्याचे काम या अधिकाऱ्यांनीही केलेच!

धरण उशाला अ्न कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरकरांची (Chhatrapati Sambhajinagar) झाली आहे. धरण पाण्याने तुडुंब भरलेले असताना इकडे शहरातील नळ मात्र कोरडेच राहतात. पाण्याच्या विषयात राजकारण करून जनतेच्या तोंडचे पाणी पळविण्याचे पाप शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांनी वीस वर्षांत केले. या काळात तब्बल तेरा आयुक्तांनी महापालिकेचा कारभार पाहिला, पण राजकारण्यांच्या 'हातचे बाहुले' बनलेल्या या अधिकाऱ्यांनी शहराच्या पाणीप्रश्‍नावर कधीच खंबीर भूमिका घेतली नाही.

समांतर योजनेतून पाणी किमान नक्षत्रवाडीपर्यंत आले असते तरी आज शहराचे चित्र वेगळे दिसले असते. 'समांतर' घालविण्यात तत्कालीन विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी खुबीने डोके वापरले, तर ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रस्ताव मांडून 'समांतर'सोबत शहराच्या पाण्याचा खेळ खल्लास केला. (Water Crisis) जनता एकीकडे 'पाणी पाणी' असा टाहो करत असताना दुसरीकडे शहरात आलेला प्रत्येक आयुक्त 'जलश्री'या बंगल्यातील स्वीमिंग पुलात भर उन्हाळ्यातही डुबकी मारत मस्त राहिले!

वीस वर्षात तब्बल 13 आयुक्त होऊन गेले. राजकारण्यांच्या चांगल्या वाईट निर्णयांना फक्त मान डोलवण्याचे काम करून या आयएएस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी वेळकाढू भूमिका घेतली. नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या पाण्याच्या प्रश्नात दोघांनाही सोयीस्कर भूमिका घेतल्या. त्यामुळे आज जनतेचे हाल होत आहेत. 2005 पासून 2016 पर्यंत समांतर पाणीपुरवठा योजनेवर महापालिकेतील आठ आयुक्तांनी काम केले. त्यासोबतच राज्य, केंद्र शासनात काम करणाऱ्या 12 ते 15 आयएएस अधिकाऱ्यांनी 'समांतर'च्या प्रस्तावावरून हात फिरविला.

पण, ही योजना तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दोषपूर्ण वाटली. केंद्रेकारांच्या भूमिकेची 'री' ओढत बकोरियांनी 2016 मध्ये प्रस्ताव सादर करत समांतरची फाइलच बंद केली. समांतरला विरोध करणारेच आज किमान नक्षत्रवाडीपर्यंत हे पाणी आले असते तरी आज आठ आठ-दहा दहा दिवस नळ कोरडे राहिले नसते, असे सांगत आहेत. विशेष म्हणजे, 2005 ते 2025 पर्यंत तेरा आयुक्त झाले, पण यातील अनेकांनी राजकारण्यांच्या अवतीभवती राहण्यातच धन्यता मानली. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आज शहरात पाणीबाणी आहे.

या आयुक्तांनी लावली वाट

असीमकुमार गुप्ता ते जी.श्रीकात यांच्या कार्यकाळात संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचे बारा वाजले. पंचवीस वर्षात महापालिकेत आसीम कुमार गुप्ता, दिलीप बंड, वसंत वैद्य, डाॅ. पुरुषोत्तम भापकर, डाॅ. हर्षदिप कांबळे, प्रकाश महाजन, सुनील केंद्रेकर, ओमप्रकाश बकोरिया, डी.एम.मुगळीकर, निपूण विनायक, आस्तिककुमार पांडेय, अभिजीत चौधरी, जी. श्रीकात यांचा यात समावेश आहे. या सगळ्या समांतर, राज्य शासनाची 1680 कोटीची योजना, पुढे ती अमृत योजनेत जाऊन ती 2740 कोटींवर गेली. योजना आल्या, त्यांचे आकडे फुगले, पण प्रत्यक्षात नळाला थेंबभर पाणीही आले नाही.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT