Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुम्ही गावाला पाणी देऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजीनगरचा विषय तुमच्या आवाक्याबाहेर! दानवेंनी खासदार भुमरेंना फटकारले

Ambadas Danve slams Sandipan Bhumre for his failure to address the water crisis in Paithan : खासदार संदीपान भुमरे ज्या तालुक्यातून आपण येता त्या पैठणमध्ये नागरिकांची तहान विकतच्या पाण्यावर भागवली जात आहे. रोज तीन हजार जारच्या पाण्याची विक्री अन् नळाला दोन दोन दिवस पाणी नाही ही स्थिती.
Ambadas Danve -Sandipan Bhumre News
Ambadas Danve -Sandipan Bhumre Newssarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न उन्हाचा पारा वाढतोय तसा पेटतोय. पंचवीस वर्ष महापालिकेची सत्ता आणि राज्यात तीनवेळा युतीची सत्ता येऊनही छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे तो या उन्हाळ्यात सुटेल आणि लोकांच्या नळाला दररोज पाणी येईल, ही भाबडी कल्पाना न केलेलीच बरी. परंतु या पाण्याच्या राजकारणावरून पुढाऱ्यांमध्ये मात्र भलताच जोश आलाय.

विशेषतः शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते या मुद्यावरून एकमेकांवर तुटून पडले आहेत. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी काल चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे यांच्यावर टीका केली होती. (Ambadas Danve) अंबादास दानवे हे कागदोपत्री नेते आहेत, तर चंद्रकांत खैरे यांना आता कोणी विचारत नाही. या दोन नेत्यांनीच जिल्ह्याचा बट्टयाबोळ केला. खैरे यांच्यामुळे अनेक पाणीयोजना गेल्या, असाही आरोप भुमरे यांनी केला. यावर अंबादास दानवे यांनी पैठणमधील पाण्याची स्थिती दर्शवत भुमरे यांना टोला लगावला.

खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) ज्या तालुक्यातून आपण येता त्या पैठणमध्ये नागरिकांची तहान विकतच्या पाण्यावर भागवली जात आहे. रोज तीन हजार जारच्या पाण्याची विक्री अन् नगरपालिकेच्या नळाला दोन दोन दिवस पाणी नाही ही स्थिती. तुम्ही तुमच्या गावाला पाणी देऊ शकत नाहीत, मग छत्रपती संभाजीनगरचा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा आहे, असा पलटवार अंबादास दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve -Sandipan Bhumre News
Sandipan Bhumre On Khaire-Danve : अंबादास दानवे कागदोपत्री नेते, तर खैरेंनी आता नातवंड सांभाळावीत! खासदार भुमरेंचा टोला

दानवे-खैरे यांच्यावर टीका करताना खासदार संदीपान भुमरे यांनी पैठण मतदारसंघाचा वीस वर्षात आपण किती विकास केला, संपूर्ण तालुक्यातील पाणी योजना पूर्ण झाल्याचा दावा केला होता. यावर अंबादास दानवे यांनी जायकवाडी धरण उशाला असलेल्या पैठणकरांच्याच घशाला कशी कोरड लागली आहे, हे दाखवून देत भुमरे यांच्या विकासाचे दावे खोडून काढले.

Ambadas Danve -Sandipan Bhumre News
Chandrakant Khaire On Ambadas Danve : आम्ही पक्षासाठी जेलमध्ये गेलो, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास दानवे आला अन् काड्या करतो! चंद्रकांत खैरेंचा पारा चढला

लबाडांनो पाणी द्या..

सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित पाणी प्रश्नावर आम्ही आंदोलन आमच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जाहीर केले आहे. शहराची 1680 कोटींची योजना 2700 कोटी रुपयांच्या पुढे नेऊन ठेवली आजच्या सरकारने. आणि यातील 950 कोटींचा भार आपल्या शहरवासीयांच्या माथी मारायला निघाले आहेत.

Ambadas Danve -Sandipan Bhumre News
Ambadas Danve On Gulabrao Patil : गुलाबराव.. गद्दारी अन् फोडाफोडीची सवय विद्यार्थ्यांना लावू नका!

देवेंद्र फडणवीसजी, आपण आक्रोश मोर्चा काढला होतात आणि नंतर खोटी आश्वासने दिलीत. आता आम्ही त्या प्रत्येक आश्वासनाची आठवण करून देऊच पण पाणीबाणी असताना आयपीएल बघत फिरणाऱ्या आयुक्तांना लोकांच्या नळापर्यंत आणून बसवू, असा इशाराही अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com