Dr. Anjali Ghadge joins Sharad Pawar NCP Sarkarnama
मराठवाडा

Dr. Anjali Ghadge: केज मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’त आणखी एका इच्छुकाची भर; डॉ. अंजली घाडगेंचा प्रवेश

Datta Deshmukh

Beed News: कॉंग्रेस पक्षाकडून 2014 मध्ये केज विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या डॉ. अंजली घाडगे (Dr. Anjali Ghadge) यांनी आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश (Sharad Pawar NCP) केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात त्यांनी प्रवेश केला आहे.

2014 मध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविली. यावेळी केज मतदार संघातून डॉ. अंजली घाडगे अचानक निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांना ३५ हजार मतांचा पल्ला पार केला होता.

अचानक निवडणुकीत उतरलेला उमेदवार पुन्हा दिसत नाही आणि लाटेत विजयी झालेला पुन्हा टिकत नाही, असे शेकडो उदाहरणे असताना डॉ. अंजली घाडगे याला अपवाद ठरल्या होत्या. त्या सातत्याने मतदार संघात सक्रिय राहिल्या.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल, ही त्यांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे त्या पुन्हा त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्विकारले.

आता विधानसभा निवडणुकीसाठी केज मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुकांची गर्दी वाढत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत २० वर्षांत प्रथमच केज मतदार संघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्क्य मिळाले आहेत.

केज हे खासदार बजरंग सोनवणे यांचे होमपिच आहे. पक्षात माजी आमदार पृथवीराज साठे उमेदवारीवर दावा करीत आघाडीवर आहेत. मागच्या काळात भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

गोकुळ जाधव देखील विविध माध्यमांतून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. आता उच्चशिक्षीत कुटूंबातील डॉ. अंजली घाडगे यांनी तर थेट पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे दिवंगत वडिल केजच्या शैक्षणिक वर्तुळात कार्यरत होते. पती आयकर विभागात उच्चपदस्थ अधिकारी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT