Marathwada Political News  Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : रामदास कदमांना फोनवरून शिवीगाळ करणाऱ्या पाटील विरुद्ध गुन्हा..

Sambhajinagar News : क्रांती चौक पोलिस ठाण्यात रमेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : राज्यातील विविध नेते, मंत्री, आमदार, खासदारांना फोन करून मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर जाब विचारणाऱ्या रमेश पाटील याची समाज माध्यमांमध्ये बरीच चर्चा होते. (Fir Filed News) केंद्रीय मंत्री नारायण राणे, गुलाबराव पाटील, माजी मंत्री रामदास कदम, आमदार संजय शिरसाट, हरिभाऊ बागडे यांच्यासह राज्यभरातील राजकीय नेत्यांना फोन करून रमेश पाटील गेल्या वर्षभरापासून भंडावून सोडत आहे.

मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेले असतांना त्याने नारायण राणे, रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना फोन करून राजीनामे देण्याची मागणी करत आहे. (Fir Filed) या दरम्यान झालेले संभाषण समाज माध्यमांवर व्हायरलही झाले आहे. दरम्यान, माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना फोन करून शिवीगाळ करणे रमेश पाटील याच्या चांगलेच अंगलट आले आहे.

पोलिसांनी स्वतःहून दखल घेत रमेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्यात रमेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marathwada) सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार राहुल काळे यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. २७) सोशल मीडियावर रमेश पाटील याने कॉल करून रमेश कदम यांच्याशी संवाद साधलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जवळपास साडेचार मिनिटाच्या या ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला रमेश हा कदम यांना आरक्षणाविषयी प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर मध्येच त्याने कदम यांना शिवीगाळ करून ती रेकॉर्डिंग कदम व स्वत:च्या छायाचित्रांसह सोशल मीडियावर व्हायरल केली. वरिष्ठ पातळीवर याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संतोष पाटील पुढील तपास करत आहेत. रमेश पाटील हा `नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे`, या बॅनरमुळे चर्चेत आला होता.

या बॅनर प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी भागात त्याने हे पोस्टर लावल्यानंतर भाजपच्या महिलांनी ते फाडत पाटील याच्याविरोधात आंदोलन गेले होते. पोलिस आयुक्तालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन करतांनाही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. राजकीय नेत्यांना फोन करून त्यांच्याशी झालेले संभाषण समाज माध्यामांवर व्हायरल करत पाटील याने बरीच प्रसिद्धी मिळवली. पण ही प्रसिद्धीच आता त्याच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT