Devendra Fadnavis On Lathicharge : 'लाठीचार्ज'चा आदेश गृहमंत्र्यांचा नसतो'; 'त्या' घटनेवर फडणवीस मोकळेपणाने बोलले!

Devendra Fadnavis On Lathicharge : "जे चुकलं आहे ते चुकलं. हे मान्य केलं पाहिजे."
Devendra Fadnavis On Lathicharge
Devendra Fadnavis On LathichargeSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis On Lathicharge : जालना जिल्ह्यातील अंतरवली (ता. अंबड) येथे मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या आंदोलनातील आंदोलकांवर लाठीमारानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली होती. या घटनेला राज्याचे गृहमंत्रालय आणि परिणामी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. वरून आदेश दिल्यानंतरच लाठीमार झाला, असे विरोधी पक्षनेत्यांनीही आरोप केले होते. याबाबत फडणवीस यांनी जाहीर माफीही मागितली होती. यावर आता खुद्द फडणवीसच यावर मोकळेपणाने बोलले आहेत. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis On Lathicharge
Sanjay Raut On Fadnavis : फडणवीस 'पुन्हा येणार' असतील तर स्वागतच.. ; संजय राऊतांचे 'सूचक' वक्तव्य!

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, "जरांगेंच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला तो चुकीचा होता, दुर्दैवी होता. मला माहितीच नव्हतं की लाठीचार्ज झाला. जे कोणी आजपर्यंत गृहमंत्री झालेत त्यांना हे माहिती आहे की, लाठीचार्ज करण्यासारखा निर्णय वर विचारावं लागत नाही. तिथला जो अधिकारी असतो, त्याला याबाबतचे कायद्याने अधिकार दिले आहेत. मला ही हे सर्व घटना घडून गेल्यानंतर समजलं. मी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला याबाबत विचारणा केली. त्यांनी सांगितलं की, 'थोडी झटापट झाली. पोलिसांवरही हल्ला झाला.' पण मला या घटनेची तीव्रता माहिती नव्हती. मी त्यावेळेस एवढंच बोललो की, पोलिसांनीही लागलेलं आहे. अशा प्रकारची घटना घडली आहे. "

Devendra Fadnavis On Lathicharge
NCP Replied PM Modi : कृषिमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ? मोदींच्या टीकेला राष्ट्रवादीने यादीच दिली

फडणवीस पुढे म्हणाले, "नंतर मी पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली. पोलिसांनी जे काही केलं चुकीचं केलेलं आहे. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती. हा लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांनाही जखमी व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे कारवाई केली आणि मी स्वत: लाठीचार्जशी संबंध नसतानाही याची जाहीर माफी मागितली. कुठल्याही समाजावर अन्याय झाला तर राज्यकर्ते म्हणून आपला इगो असण्याचं कारण नाही. जे चुकलं आहे ते चुकलं. हे मान्य केलं पाहिजे," असे फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com