<div class="paragraphs"><p>Mla Satish Chava Aurangabad</p></div>

Mla Satish Chava Aurangabad

 

Sarkarnama

मराठवाडा

अध्यापकांना संवर्गनिहाय आरक्षण लागू होणार

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील महाविद्यालय, विद्यापीठांत आता अध्यापकांना संवर्गनिहाय आरक्षण लागू होणार आहे. (Aurangabad) याबाबतचे विधेयक नुकतेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. (Marathwada) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (reservation) यासंदर्भात शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

सध्या अध्यापकीय पदांना विषयनिहाय आरक्षण लावण्याचे धोरण अस्तित्वात आहे. त्यामुळे काही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याने विषयनिहाय ऐवजी संवर्गनिहाय आरक्षण लागू करावे अशी मागणी सतीश चव्हाण यांनी शासनाकडे केली होती. २१ जून २०१९ रोजी विधान परिषदेत त्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई २ सप्टेंबर २०२१ रोजी प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी झालेल्या बैठकीत देखील चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित करून प्राधान्याने सोडवण्याची आग्रही मागणी केली होती. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबाबतचे विधेयक एकमताने मंजूर झाल्याने अध्यापकांना संवर्गनिहाय आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

शैक्षणिक तसेच प्राध्यापकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण व जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT