माफियांना प्रोत्साहन देणारे नेतेही जबाबदार; भाजपच्या पोकळेंचा निशाणा कोणावर?

आता नेमकी कोणी कोणाला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली आणि माफिया किंगला प्रोत्साहन कोणी दिले, असे पोकळेंना म्हणायचेय हे त्यांनाच ठाऊक. (Bjp)
Bjp Leader Ramesh Pokale Beed

Bjp Leader Ramesh Pokale Beed

Sarkarnama

Published on
Updated on

बीड : जिल्ह्यातील अवैध धंदे व माफियागिरीकडे डोळेझाक करणारे प्रशासकीय अधिकारी जेवढे जबादार आहेत, तेवढेच माफिया किंगला प्रोत्साहन देणारे समाज घटक व सर्वपक्षीय राजकीय नेते देखील जबाबदार आहेत, असे भाजपचे (Bjp) माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी म्हटले आहे. (Beed) पोकळेंचा निशाणा नेमका कोणावर, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

त्यांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टवर विविधार्थी कमेंट देखील येत आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे व काही काळ पंकजा मुंडे यांचे निष्ठावंत असलेले रमेश पोकळे (Gutkha Mafiya) अलिकडे त्यांच्यापासून दुरावले आहेत. अनेक वर्षे भाजप जिल्हाध्यक्ष राहिलेल्या पोकळेंच्या कार्यकाळात भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळविले आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गुटखा गोदामांवर छापे टाकल्यानंतर आरेापींच्या यादीत एका शिवसेनेच्या बड्या पदाधिकाऱ्याचे नाव आले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांचे पद काढून घेतले. त्यातच मंगळवारी रात्री पुन्हा कुमावतांनी बीडजवळील एका स्पोर्ट क्लबच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

४७ जुगाऱ्यांना अटक झाली आणि एकूण ५० आरोपींवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला गेला. यात ५० व्या क्रमांकाचे संशयीत आरोपी म्हणून भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या क्लबसाठी त्यांनी जागा भाड्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद असले तरी आपला जागेशी संबंध नाही, ही जागा भावाची असून त्यांनी ती जागा रितसर भाड्याने दिल्याचे संबंधीत पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

<div class="paragraphs"><p>Bjp Leader Ramesh Pokale Beed</p></div>
नगर - बीड मार्गावर रेल्वे धावली; श्रेय विलासराव देशमुख यांचेच..

`बीड जिल्ह्यात सर्वच क्षेत्रातील माफियाकिंग व नंबर दोन चे अवैधं धंदे (मटका, गुटखा, बनावट दारू निर्मीती व विक्री, अवैध गौण खनिज खरेदी विक्री) याकडे डोळेझाक करणारे पोलिस अधिकारी जेवढे जिम्मेदार आहेत तेवढेच.. या माफियाकिंगला व अवैध धंदे करणारे यांना सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मिळवून देणारे सर्व समाज घटक व प्रोत्साहन देणारे सर्वपक्षीय नेते हि जबाबदार आहेतच. हे भयान वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही`, अशी पोस्ट त्यांनी सोशल मिडीयावर टाकली आहे. आता नेमकी कोणी कोणाला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली आणि माफिया किंगला प्रोत्साहन कोणी दिले, असे पोकळेंना म्हणायचेय हे त्यांनाच ठाऊक.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com