Protest For Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Protest For Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी केंद्र आणि राज्य सरकारची इच्छा नाही...

Maratha Reservation : महिला आंदोलकांनी आरक्षण मिळाले नाही तर उद्याच आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे सकल मराठा समाजातर्फे ओबीसीतून आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भेट दिली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे, अशी आंदोलकाची मागणी असून मराठा समाज अनेक बाबतीत मागास असून सुद्धा त्यांना आरक्षण नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आंदोलकांनी सकल मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी भेट देऊन आंदोलकाची समजूत काढली. (Shivsena) आंदोलकांनी यावेळी सांगितले, की पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्हे वगळता अन्य राज्यभरातील मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र दिले, मग हक्काचे आरक्षण का दिले जात नाही.

तसेच राज्यभरातील मराठा समाजाला पूर्वीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. मराठा समाज सामाजिक बाबतीत मागास असल्याचे अनेक आयोग समित्या व शासकीय माहितीतून सिद्ध झाले आहे. (Marathwada) तरी सुद्धा आरक्षण का दिले जात नाही, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून सकल मराठा समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे बेमुदत आंदोलन सुरू आहे.

येथील महिला आंदोलकांनी आरक्षण मिळाले नाही तर उद्याच आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहे, परंतु मराठा आरक्षणासाठी ते काहीही करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकांची भेट घेवून चर्चा केल्यानंतर दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेलेले नाहीत.

शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी केंद्रातील भाजप व व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारची भावना आहे. तसेच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास कमी पडल्याचा आरोप देखील दानवे यांनी यावेळी केला. तसेच फडणवीस सरकार यांनी विरोधी विरोधी पक्षात असताना आमचे सरकार आल्याबरोबर मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते. मात्र ते आश्वासन त्यांनी पाळले नाही, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT