Rashtrawadi New President: NCP च्या अध्यक्षाबाबत जयंत पाटील म्हणाले, "दिल्लीत माझी ओळख नाही.."

Jayant Patil On NCP New President : तुम्ही पवारांचे मन वळवले का ?
Jayant Patil ON Rashtrawadi New President
Jayant Patil ON Rashtrawadi New President Sarkarnama

Jayant Patil ON Rashtrawadi New President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार पायउतार होणार असतील, तर कोण अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरु आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

"जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करावे," अशी मागणी शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी केली आहे. त्यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शरद पवार हे अनुभवी आहेत. ते देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचे काम करू शकतात. शरद पवारांना एवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास आहे. यामुळेच देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील लोक राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. पण, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर ठाम आहेत. आणि पक्ष पुढे नेण्यासाठी पाऊल टाकले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.” असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil ON Rashtrawadi New President
NCP New President: शालिनीताईंचा शरद पवारांना ज्येष्ठतेचा सल्ला; म्हणाल्या, 'अजित पवार घोटाळेबाज.., त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल!

दुसऱ्या राज्याशी माझा संपर्क देखील नाही...

सरोज पाटील यांच्या मागणीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर जयंत पाटील म्हणाले, "दिल्लीत माझी ओळख नाही, आणि दुसऱ्या राज्याशी माझा संपर्क देखील नाही. “मी महाराष्ट्रात काम करतोय. यामुळे लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या व्यक्तीने अध्यक्षपद भूषवावे," “राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अध्यक्षपद भूषवावे”, असे जयंत पाटील म्हणाले.

अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयावर तुम्ही पवारांचे मन वळवले का ? या प्रश्नांवर जयंत पाटील म्हणाले, "देशभरातली विविध नेत्यांकडून शरद पवारांना निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली जात आहे. परंतु, शरद पवार हे त्यांच्या निर्णायवर ठाम आहे. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घातले आहे.

Jayant Patil ON Rashtrawadi New President
Sharad Pawar News : 'लोक माझे सांगाती'तून पवारांनी ठाकरेंच्या आरोपांमधील हवाच काढली..; ठाकरे गटाला उघडं पाडलं..

“राज्यातील असंख्य कार्यकर्ते, तरुणांना आणि शरद पवारांसोबत काम केले सर्वांनी आग्रह केला आहे की, शरद पवारांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पद त्यांच्याकडे ठेवावे, अशी लोकांची मागणी आहे. मी शरद पवार यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांची भावना पोहोचवली आहे,” (Political Short Videos)

"शरद पवार अध्यक्ष नाही, म्हटल्यावर कार्यकर्ते निराश झाले आहेत. शरद पवार नसतील तर पक्षात आपल्याला न्याय मिळेल का?, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या भीती आणि नाराजीपोटी त्यांनी राजीनामा दिला आहे. त्या सर्वांना आम्हाला समजावे लागेल,” असे जयंत पाटलांनी राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्यावर सांगितले.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या शरद पवारांच्या या निर्णयानंतर सरोज पाटील यांनी भाष्य करत हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. “हा निर्णय अतिशय वेदनादायक आणि धक्का देणारा आहे. सध्या देशात अराजकता माजली आहे. लोकशाही जगती की नाही, असा प्रश्न पडला आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय. अतिशय अस्वस्थ असं वातावरण असताना अचानक शरद पवारांनी राजीनामा दिल्याने खूप मोठा धक्का बसला आहे.” असे त्या म्हणाल्या. (Political Web Stories)

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com