Pankaja Munde - Ashok Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Central Government News : केंद्राची पंकजांच्या 'वैद्यनाथ'वर 'वक्रदृष्टी'; तर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांसाठी 'साखर' पेरणी !

Ajit Pawar- Amarsinh Pandit - Ashok Chavan : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला या कर्जाच्या यादीतून टाळले, मात्र...

Datta Deshmukh

Beed News : केंद्र सरकारने गेल्या वर्षी नव्याने सहकार खाते काढून याचे मंत्रिपद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले. या राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत आजारी कारखान्यांना मदतीच्या यादीत आता उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अमरसिंह पंडित यांच्या कारखान्यांचा समावेश झाला आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सोमवारी राज्यातील चार सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत राज्य सरकारकडून मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्याबाबत शासन आदेश काढले आहेत.

यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अर्धापूर (जि. नांदेड) येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला तब्बल १४७ कोटी ७९ लाख रुपयांच्या रकमेचे कर्ज राज्य शासन हमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मंजूर करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला या कर्जाच्या यादीतून टाळले मात्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्या कारखान्याचा यात समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या सहकार विकास निगम मार्फत राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना मदतीच्या यादीत यापूर्वी केवळ भाजपच्या नेत्यांशी निगडित सहा साखर कारखान्यांचा समावेश होता. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आमदार अभिमन्यू पवार आदींच्या कारखान्यांचा समावेश होता. पूर्वीच्या प्रस्तावात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता. मात्र, मदतीच्या यादीतून हा कारखाना टाळला होता.

सोमवारी शासनाने चार कारखान्यांना मदतीबाबतचे शासन आदेश काढले आहेत. यात अजित पवार यांच्या इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याला १२८ कोटी रुपये, पवारांचे समर्थक माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गेवराई (जि. बीड) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्यास १५० कोटी रुपये, तर काँग्रेसचेच माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या भाळवणी, पंढरपूर (जि. सोलापूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास १४६ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी दिली आहे.(Sugar Factory)

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT