NCP Political News : शरद पवार गटाच्या कार्यकारिणीत आमचेच पदाधिकारी ; आनंद परांजपेंचा मोठा दावा

Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाळी होऊन,शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत.
Anand Paranjape
Anand Paranjape Sarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Thane News : मागील दोन दिवसापूर्वी ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची कार्यकारिणी जाहीर झाली होती.यात अनेक नवीन जुन्या चेहऱ्यांना संधी देत,युवकांची फळी उभी मजबूत करण्याचा प्रयत्न या यादीच्या माध्यमातून करण्यात आला.

पण दुसरीकडे या यादीवर अजित पवार गटाने आक्षेप नोंदवत,कार्यकारिणीत निवडण्यात आलेले पदाधिकारी हे आमचेच असल्याचा दावा ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे(Anand Paranjape) यांनी केला आहे.त्यामुळे आता पुन्हा दोनही गट आमने सामने येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Anand Paranjape
MLA Ravindra Waikar: दसरा मेळाव्याआधीच ठाकरेंच्या आमदाराची पत्नी चौकशीच्या फेऱ्यात

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाळी होऊन,शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. त्या दोन्ही गटाकडून पक्ष व संघटनात्मक बांधणीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.त्यानुसार मागील दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणी जाहीर झाली करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यकारिणीत जुन्या नव्यांना संधी देत,युवकांची फळी उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशातच आता,या यादीवर अजित पवार गटाने बोट ठेवत ज्या पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यातील काही पदाधिकारी हे अजित पवार गटात आधीच सहभागी झाले असून त्यांना महत्वाची पदेही देण्यात आल्याचा दावा शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.

त्यामुळे किमान आपल्या गटात कोण कोणते पदाधिकारी आहेत,याची तरी माहिती घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. परांजपे यांनी केलेल्या दाव्यामुळे पदाधिकारी देखील आता संभ्रमित झाले आहेत. त्यातही कोण कुठे हे अद्यापही चित्र स्पष्ट झाले नसल्याचेच दिसत आहे. (Sharad Pawar)

राष्ट्रवादी दोन गटात विभागल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते हे आजही संभ्रमात आहेत, कधी इकडे तर कधी तिकडे अशा द्विधा मनस्थीत ते असल्याचे दिसत आहेत. त्यांनाही दोन गट झाल्याचे पचनी पडलेले नाही. परंतु सर्वांना आपलेसे करण्यासाठी आधी अजित पवार (Ajit Pawar) गटाने ऑगस्ट महिन्यात कार्यकारिणी जाहीर केली होती.त्यात अनेकांना संधी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या पदांवरुन आता पुन्हा शरद पवार व अजित पवार गट आमने सामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष शशिधर जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी तर सुनील पाटील यांची ठाणे शहर (जिल्हा) चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Anand Paranjape
Nana Patole News : देशातील बंदरे मित्रांना दिल्यापासूनच ड्रग्जचे विष पसरण्यास सुरुवात ; पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com