Umarga Agitation  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : उमरग्यातील पाच जणांच्या उपोषणाला दुसऱ्याच दिवशी शेकडोंचा पाठिंबा

Maratha Agitation : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी कवठ्यात शनिवारी केले जाणार 'चूल बंद' आंदोलन

Rashmi Mane

अविनाश काळे

Manoj Jarange Agitation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा (जि. धाराशिव) येथे काल (बुधवार) पाच जणांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज (गुरुवार) या उपोषणात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच, विविध पक्ष, संघटना, शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांनी उपोषणस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमरगा येथे तहसील कार्यालयासमोर काल (बुधवार)पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. आज (गुरुवार)विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. उदय मोरे, डॉ. यतिराज बिराजदार, भास्कर शिंदे, खंडू मोरे, राजेंद्र भोसले, बालाजी गायकवाड, मारुती पाटील, बळीराम गायकवाड, प्रताप गायकवाड उपोषणाला बसले.

या वेळी शांतकुमार मोरे, संताजी चालुक्य, बाळासाहेब माने, शहाजी पाटील, प्रा. व्ही. एम. पाटील, बाबूराव शहापूरे, विवेक हराळकर, उमाकांत माने आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.

युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांनी उपोषणस्थळी थांबून पाठिंबा दिला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल ऊर्फ पप्पू सगर, विजय वाघमारे, चंद्रशेखर पवार, अभिषेक औरादे आदी उपस्थित होते. याचबरोबर उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे सुरू असलेल्या उपोषणालाही वाढता पाठिंबा मिळत आहे.

भारत शिक्षण संस्थेचा पाठिंबा-

भारत शिक्षण संस्था व त्यांच्या विविध शाखांच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी रॅली काढून उपोषणस्थळाला भेट दिली. प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, नितीन कोराळे आदी उपस्थित होते.

मुस्लिम जमात कमिटीचा पाठिंबा -

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा तालुका सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मुस्लिम जमात कमिटीचे पदाधिकारी बाबा औटी, अलीम विजापुरे, अब्दुल रझ्झाक अत्तार, कलीम पठाण, मुजीब इनामदार, निजाम व्हंताळे आदींनी उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिला.

उपोषणस्थळी सर्वपक्षीय विद्यमान खासदार, आमदारांना बंदी-

उपोषणस्थळी सर्वपक्षीय विद्यमान खासदार व आमदारांना बंदी घालण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहेत. तुरोरी, तुगाव, मुरूम, वागदरी, कोराळ, नाईचाकूर, कवठा, नारंगवाडी, तलमोड, गुगळगाव, कदेर, गुंजोटी, मातोळा, चिंचोली (ज.), मुळज, पेठसांगवी आदी गावांत आमदार, खासदारांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT