Chakur municipality chairman election; Bhagwat Phule sarkarnama
मराठवाडा

Chakur Municipal Council : चाकूर नगरपालिकेत मोठ्या राजकीय घडामोडी! नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी; नाव निश्चित, अर्जही दाखल

Chakur Municipal Council President Election : चाकूर नगरपंचायतीला लवकरच नवे नगराध्यक्ष मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

प्रशांत शेटये

Latur Poitics : प्रशांत शेटे

चाकूर नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी सोमवारी (ता.13) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक भागवत फुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. अब्दुल करीम गुळवे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.

या निवड प्रक्रियेनुसार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक भागवत फुले यांनी मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत भागवत फुले यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

त्यामुळे चाकूर नगरपंचायतीला लवकरच नवे नगराध्यक्ष मिळणार आहेत. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समवेत सर्व नगरसेवकांची बैठक होऊन फुले यांच्या नावावर एकमत झालेले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता.17) दुपारी बारा वाजता नगरपंचायत सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून त्यामध्ये नगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. अब्दुल करीम गुळवे यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडीकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागवत फुले यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची गरज भासणार नाही. युवा नेतृत्वामुळे नगरपंचायतीच्या पुढील विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, माजी नगराध्यक्ष करीम गुळवे, नगरसेवक मिलिंद महालिंगे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, उषा सोनकांबळे, नगरसेवक विलासराव पाटील, मच्छींद्र नागरगोजे, उपसभापती भुजंग शिंदे, सरपंच डॉ. भालचंद्र चाटे, शिवाजी काळे, संदीप शेटे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT